Hashtagintro

गायीचे गोमूत्र भारतीय चाटतात, थेट उडवला मजाक, कोण आहे तो इस्त्रायलयच्या धर्मगुरू..

गायीचे गोमूत्र भारतीय चाटतात, थेट उडवला मजाक, कोण आहे तो इस्त्रायलयच्या धर्मगुरू..

हिंदु धर्माबद्दल अपशब्द वापरल्याने इस्त्रायलचे धर्मगुरू इस्त्रायली-अमेरिकी रब्बी योसी मिजराही वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर भारतीय आणि इस्त्रायली लोक त्यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी भारतीय डॉक्टरांचाही मोठा अपमान केला. मिजराही यांना दावा केला की, काही भारतीय लोक गोमूत्र चाटतात आणि पितात. हेच नाही तर काही डॉक्टरही हे करतात. दिल्लीतील रस्त्यावर गायींमुळे वाहतूक कोंडी झाल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भारताचा मजाक उडवला. त्यांनी लोकांना नक्षलवादी म्हणत धार्मिक परंपरावरून टीका केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ते एका भारतीय व्यक्तीचा उल्लेखही करताना दिसत आहेत. त्यांना दावा केला की, तो व्यक्ती अगोदर फेसबुक पेजसाठी काम करत होता. त्याला यहूदी धर्म स्वीकारायचा होता.

हे बोलतानाच त्यांनी भारतात गायीची पूजा करतात, यावर टीका केली. काही लोक गायींना आपल्या घरातही ठेवतात. गायींना स्पर्श करतात आणि त्यानंतर ते गोमूत्र पितात. हेच नाही तर भारतीय लोक गोमूत्र विकतही घेतात. भारतीय डॉक्टरांबद्दल अपशब्द वापरत त्यांनी म्हटले की, नवी दिल्लीतील डॉक्टरही गायीचे गोमूत्र पितात. जर गायी रस्त्यावर आल्या तर त्यांना बाजूला करण्याचीही हिंमत कोणाची नाही.

मिजराही यांच्या या व्हिडीओनंतर लोक त्यांच्यावर संताप व्यक्त करत असून जोरदार टीका करत आहेत. भारतात राहणारे रोसेनमॅन यांनी मिजराही यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना म्हटले की, यामुळे इस्त्रायलची छाप जागतिक स्तरावर यामुळे खराब होत आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्टही शेअर केली. त्यांनी म्हटले की, यामुळे इस्त्रायलची प्रतिष्ठा खराब होत आहे.

हेच नाही तर त्यांनी मागणी केली की, रोसेनमॅनने म्हटले की, मिजराही यांना इस्त्रायलमधील येण्यासही बंदी घालायला हवी. ब्रिटेनमध्येही त्यांच्या प्रवेशावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मिजराही हे कायमच वादात राहतात. यापूर्वीही त्यांनी अशाचप्रकारची अनेक विधाने केली आहेत. त्यांना ब्रिटेनमध्ये येण्यावरून वाद झाला. ते भारतातही आले होते.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language