Hashtagintro

गुरूजींच्या महासत्संगात कोणी हात जोडले, तर कोणी ढसाढसा रडलं..; कोण आहेत निर्मल सिंहजी महाराज?

गुरूजींच्या महासत्संगात कोणी हात जोडले, तर कोणी ढसाढसा रडलं..; कोण आहेत निर्मल सिंहजी महाराज?

बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बाहेरून कितीही ग्लॅमरस दिसत असलं, तरी त्यांच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार असतात. प्रसिद्धी, पैसा आणि लोकप्रियता असूनही मनःशांतीसाठी अनेक कलाकार अध्यात्माचा आधार घेतात. याचीच प्रचिती नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका महासत्संगात आली. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी गायिका आणि संगीतकार हिमेश रेशमिया भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर अभिनेत्री चाहत खन्ना हिला प्रार्थना करताना अश्रू अनावर झाले. भूमी पेडणेकर आरती करताना आणि हात जोडून प्रार्थना करताना दिसली. या कलाकारांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

हिमेश रेशमिया, चाहत खन्ना भावूक

16 नोव्हेंबर रोजी मुंबईतील आयटीसी मराठा हॉटेलमध्ये गुरुजींच्या वार्षिक महासत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजारो भाविकांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हिमेश रेशमिया पत्नी सोनियासोबत बसून हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. यावेळी तो भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे अभिनेत्री चाहत खन्ना डोळे बंद करून हात जोडून प्रार्थना करत होती. यावेळी ती ढसाढसा रडलीसुद्धा. भूमी पेडणेकर जांभळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात आरती करताना दिसली. आरतीनंतर तिने हात जोडून प्रार्थना केली. अभिनेता नील नितीन मुकेश याने तर कार्यक्रमात आलेल्या भाविकांना स्वतःच्या हाताने प्रसाद वाटप केलं. भूषण कुमार, सेलिना जेटली, गुनीत मोंगा, सोनाली सहगल, राय लक्ष्मी, पूजा चोप्रा यांच्यासह अनेक कलाकारांनीही या महासत्संगाला हजेरी लावली.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by GlamBlitz (@glamblitzz)

कोण आहेत हे गुरुजी?

या महासत्संगामुळे सध्या ज्या गुरुजींची चर्चा होत आहे, ते म्हणजे ‘गुरुजी छतरपूर वाले’ किंवा ‘दुगरी वाले गुरुजी’. त्यांचं मूळ नाव निर्मल सिंह जी महाराज असं होतं. 7 जुलै 1952 रोजी पंजाबमधील दुगरी गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या अनुयायांमध्ये त्यांना ‘शुकराना गुरुजी’ या नावानेही ओळखलं जातं. अनेक भक्त त्यांना भगवान शिवाचा अवतार मानतात. त्यांनी आपल्या शिकवणीतून भक्ती, सेवा, प्रेम, सकारात्मकता आणि कृतज्ञतेचा संदेश दिला. दिल्लीतील छतरपूर परिसरात त्यांनी शिवमंदिराची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या अनुयायांमध्ये त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा कायम आहे. देशभरात त्यांचे अनेक भक्त असून बॉलिवूडमधील कलाकारांचाही त्यात समावेश आहे. त्यांच्या महासत्संगाचं आयोजन आजही मोठ्या भक्तिभावाने केलं जातं.

बॉलिवूड कलाकारही आहेत गुरुजींचे भक्त

गुरुजींच्या भक्तांमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, हेमा मालिनी आणि कपूर कुटुंबातील काही सदस्यही गुरुजींचे अनुयायी असल्याचं सांगितलं जातं. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि भूमी पेडणेकर यांनीही आपल्या घरी गुरुजींच्या सत्संगाचं आयोजन केलं होतं. यंदाच्या महासत्संगाला गुरुजींचे पुतणे गुरुप्रिया नवदीप सिंह गौरव उपस्थित होते. कीर्तन, भजन आणि प्रार्थनेने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. यावेळी अनेक भक्तांनी गुरुजींच्या शिकवणीमुळे आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभवही सांगितले.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language