Hashtagintro

घरातून 'या' नकोशा पाहुण्याला बाहेर काढायच आहे? मग वाचा..

घरात साफसफाई करूनही झुरळे होत राहतात. घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की मग ती कमी होत नाहीत.

झुरळे घरातील फर्निचर, कपाट, बेड, दरवाजे, खिडक्यांवर बिनदक्कतपणे फिरताना दिसतात.

अशा वेळी नक्की कोणता उपाय केल्यास झुरळे निघून जाण्यास मदत होईल ते पाहुयात.

झुरळांना मारण्यासाठी बोरिक अ‍ॅसिड पावडर मैद्यामध्ये घालून त्याच्या गोळ्या बनवा. झुरळांचा संचार असलेल्या ठिकाणी या गोळ्या ठेवू शकता.

लसूण बारीक करून, त्यात व्हिनेगर घाला. हा स्प्रे बाटलीत भरून झुरळ असलेल्या ठिकाणी फवारल्याने झुरळे कमी होण्यास मदत होईल.

पाण्यात लाल तिखट मिसळून ते एका स्प्रे बाटलीत भरा आणि घरात ज्या ठिकाणी जास्त झुरळे झाली आहेत, तिथे पाण्याची फवारणी करा. लहानांपासून दूर ठेवा.

घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी कापूर बारीक करून, त्याची पावडर बनवा. झुरळे फिरतात, त्या ठिकाणी ठेवा.

लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असते. लिंबाचा ताजा सुगंध झुरळांना आकर्षित करून पळवून लावण्यास फायदेशीर ठरेल.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language