Hashtagintro

चीनला धक्का देत नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारतात दाखल; PM मोदींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

चीनला धक्का देत नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारतात दाखल; PM मोदींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी रविवारी (22 नोव्हेंबर) संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाले. मार्चमध्ये पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. विशेष म्हणजे, पहिल्या अधिकृत द्विपक्षीय परदेश भेटीसाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. याआधी नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी चीनला पसंती दिली होती. त्यामुळे बालेन शाह यांच्या भारत दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे.

34 सदस्यीय शिष्टमंडळासह बालेन शाह भारतात

बालेन शाह यांच्यासोबत 34 सदस्यीय शिष्टमंडळही भारतात आले आहे. यात नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागले, परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल आणि मुख्य सल्लागार कुमार ब्यानजंकर यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात बालेन शाह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही त्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

मोदींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालेन शाह यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत भारत आणि नेपाळमधील व्यापार, ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प, गुंतवणूक आणि रस्ते-रेल्वे संपर्क यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्याशी संबंधित काही प्रकल्पांचे उद्घाटन होऊ शकते. तसेच नव्या प्रकल्पांची पायाभरणीही केली जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय शिक्षण, आरोग्य, शेती, अंतराळ, आपत्ती व्यवस्थापन आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्रांमध्ये काही करार होऊ शकतात. नेपाळमध्ये अलीकडे आलेल्या भीषण पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. या भागांच्या पुनर्बांधणीसाठी भारताने केलेली मदत आणि पुढील सहकार्य यावरही चर्चा होऊ शकते.

चीनला धक्का बसणार?

नेपाळचे भारत आणि चीन या दोन्ही देशांशी महत्त्वाचे संबंध आहेत. अशा वेळी बालेन शाह यांनी पहिल्या अधिकृत द्विपक्षीय परदेश भेटीसाठी भारताची निवड केली आहे. याआधी नेपाळच्या पंतप्रधानांनी चीनला पसंती दिली होती. त्यामुळे बालेन शाह यांच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. मात्र, हा दौरा चीनविरोधी भूमिका घेण्यासाठी असल्याचे कोणतेही अधिकृत संकेत नाहीत. या भेटीनंतर भारत आणि नेपाळमधील संबंधांना कोणती नवी दिशा मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language