
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात जळकी बाजार फाट्यावर भीषण अपघात घडला आहे. येथे रस्त्यावर पंचर झालेल्या उभ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने दोघांचा जागीत मृत्यू तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात संदीप शामधन मंडावत आणि सचिन नंदू जामुंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर विकास भीमराव कपाटे आणि प्रशांत व्यंदेशकर हे दोघेजण जखमी झाले आहेत. या जखमींवर बुलढाणा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिस्त्री काम आटोपून जाळीचा देव येथे परतत असताना सायंकाळी हा अपघात घडला आहे.
Source: TV9 Marathi National
