Hashtagintro

जगातील दोन शक्तिशाली नेते, पण कोणाची संपत्ती जास्त? पुतिन की ट्रम्प, कोण आहे खरा ‘कुबेर’?

जगातील दोन शक्तिशाली नेते, पण कोणाची संपत्ती जास्त? पुतिन की ट्रम्प, कोण आहे खरा ‘कुबेर’?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जगातील सर्वात ताकदवान देशांचे नेतृत्व करत आहेत. दोन्ही नेते राजकारणातील माहिर खिलाडी आहेत. एकाहून अधिक काळ त्यांनी देशांचे नेतृत्व केले आहे, पुतिन एकूण सुमारे २२ वर्षे रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प २०१६ ते २०२० आणि नंतर २०२४ ते आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यामुळे पुतिन आणि ट्रम्प यांच्यापैकी जास्त श्रीमंत कोण ? असा सवाल तुमच्या मनात नक्की आला असेल. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकन आणि रशियाचे अध्यक्ष म्हणून कोणाचे वेतन जास्त आहे.

व्लादिमीर पुतिन यांची नेट वर्थ किती?

बातम्यानुसार रशियाचे अध्यक्ष पुतिन हे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत. पुतिन यांची अंदाजित नेट वर्थ सुमारे २०० अब्ज डॉलर ( सुमारे १७.४ लाख कोटी रुपये ) म्हटली जाते. मात्र, क्रेमलिन यांनी या आकड्याला कधीच दुजोरा दिलेला नाही.कारण पुतिन यांच्या संपत्ती संदर्भात अद्यापपर्यंत अधिकृत शपथपत्र सादर करण्यात आलेले नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय विश्लेषक आणि बिल ब्राऊडर सारख्या तज्ज्ञांचा अंदाजानुसार त्यांची लपवलेली संपत्ती खूपच जास्त असू शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांची नेटवर्थ किती?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नेट वर्थ ७ अब्ज डॉलर असल्याचे म्हटले जाते. ट्रम्प हे अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत रिअल इस्टेट व्यवसाय, गोल्फ रिसॉर्ट, लायसेंसिंग डिल आणि क्रिप्टो- मीडिया वेंचर( उदा. ट्रम्प मीडिया आणि वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल ) आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार ट्रम्प यांच्याकडे रोकड भरपूर आहे. त्यांनी क्रिप्टोकरन्सी विकून कोट्यवधी डॉलर जमा केले आहेत. आणि टॅक्सनंतरही एक वेंचरचा एक भाग विकून सुमारे २०० मिलियन डॉलर आणखीन कमावले आहेत. ही कमाई त्या स्टॉकशी जोडली गेली जी त्यांनी आधी आपले वॉशिग्टन डीसी हॉटेल विकून आणि सॅन फ्रासिस्को ऑफीस कॉम्प्लेक्सला रिफायनान्स करुन जमा केली होती.

अमेरिकन आणि रशियन अध्यक्षांच्या वेतनात फरक

अधिकृत वेतनाच्या बाबतीत अमेरिकेच्या अध्यक्षांचे वेतन रशियाच्या अध्यक्षांपेक्षा जास्त आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अधिकृतपणे ४००,००० डॉलर ( सूमारे ३.३५ कोटी रुपये ) वार्षिक वेतन मिळते.

याच्या अतिरिक्त त्यांनी ५०,००० डॉलर वार्षिक खर्च भत्ता, १००,००० डॉलरचा नॉन-टॅक्सेबल ट्रॅव्हल्स अलाऊन्स आणि १९,००० डॉलरचा मनोरंजन भत्ताही मिळतो..

तर क्रेमलिननुसार रशियाच्या अध्यक्षांना वार्षिक १४०,००० डॉलर ( सुमारे १.१६ ते १.२० कोटी रु. ) चे बेसिक वेतन मिळते.

 

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language