Hashtagintro

जगात खळबळ, इराण काहीतरी भयंकर करण्याच्या तयारीत, थेट अणुभट्टीजवळच..

जगात खळबळ, इराण काहीतरी भयंकर करण्याच्या तयारीत, थेट अणुभट्टीजवळच..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. या दोन देशांमधील तणाव कमी होत नाही. अमेरिकेकडून अनेक मोठ्या धमक्या इराणला दिल्या जात आहेत. मात्र, इराण काही ढगमगताना दिसत नाही. त्यातच सकाळी इराणच्या दक्षिण भागात भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी नोंदवण्यात आली. पहाटेच्या वेळी झालेल्या या भूकंपामुळे परिसरात खळबळ उडाली. भूकम्पीय हालचाल झाल्याने पुन्हा इस्त्रायल आणि अमेरिकेचे टेन्शन वाढले. कारण ही घटना बुशेहर भागात झाली. या भागातच इराणचा अणुप्रकल्प आहे. इराणच्या अणुप्रकल्पाविरोधात अमेरिका आहे. त्यातच इराण कोणते पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

भूगर्भीय हालचाल अमेरिकेकडून मिळालेल्या अलीकडील धमकीशी असू शकते. अमेरिकेने याठिकाणी हल्ले करण्याची धमकी दिली. यूएसजीएसच्या अहवालानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू बुशेहर शहरापासून सुमारे 115 किलोमीटर अंतरावर आहे. जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता. आसपासच्चा लोकांना या भूकंपाचे धक्के जाणवले. इराणचा दक्षिण भाग भूकंपीय हालचालींच्या दृष्टीने खूप जास्त संवेदनशील मानला जातो.

या प्रदेशात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. अहवालांनुसार, येथे दररोजच लहान लहान भूकंपाचे धक्के जाणवतात. काही धक्के इतके जास्त साैम्य असतात की, ते लोकांना जाणवत देखील नाहीत. रंतु प्रगत भूकंप-निरीक्षण उपकरणांद्वारे ते नोंदवले जातात. इराण आणि अमेरिका युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अमेरिकेत निवडणुका असल्याने अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवली आहेत.

यासोबतच होर्मुज खाडीच्या आसपास असलेले सैन्यही काढून घेतले. जर या निवडणुकीत अपेक्षित परिणाम झाले नाही तर पुन्हा अमेरिका मोठे हल्ले इराणवर करू शकते. या देशात आखाती देशही होरपळताना दिसले. युद्ध टोकाला पोहोचले होते. आता अमेरिका इराणच्या पायाभूत सुविधांना टार्गेट करून हल्ले करू शकते, असे सांगितले जातंय. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागणार आहे. भारतातही कच्च्या तेलाच्या किंमती वाढताना दिसल्या.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language