भारत न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारताची 2-0 ची आघाडी कायम राहिली. पण चौथ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघ दोन गटात विभागला आहे. कसोटी मालिकेचं महत्त्व अधिक असल्याने चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यात शुभमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज हे संघात नाहीत. हे तिघंही कसोटी मालिकेत खेळणार आहेत, तर उर्वरित दोन वनडे संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. असं असताना चौथ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाचा एक चमू माउंट माऊंगनुई येथे गेला. तर शुभमन गिलच्या नेतृत्वातील दुसरा भारतीय संघ कसोटीसाठी वेलिंग्टनला गेला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघ सुखरूपरित्या माऊंट माऊंगनुई येथे पोहोचला. पण शुभमन गिलच्या नेतृत्वातील कसोटी संघाला एका वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं. खरं तर भारतीय खेळाडूंना तब्बल 26 मिनिटे जीव मुठीत धरून राहावं लागलं होतं. त्याला कारणंही तसंच आहे.
कसोटी संघासोबत नेमकं काय घडलं?
Revsportzच्या मते, भारताचा कसोटी संघ एअर न्यूझीलंडच्या फ्लाइट NZ5817ने हॅमिल्टनहून वेलिंगटनला रवाना झाला होता. या फ्लाइटमध्ये कसोटी संघातील खेळाडूंसोबत गोलंदाज प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल आणि इतर व्यवस्थापकीय स्टाफ होता. या फ्लाइटने हॅमिल्टनहून सकाळी 11 वाजून 43 मिनिटांनी उड्डाण केलं. त्यानंतर प्रवास एकदम व्यवस्थित होता. मात्र वेलिंग्टन विमानतळाजवळ पोहोचताच धाकधूक वाढवणारा प्रसंग घडला. कारण विमानाला वेगाने येणारा वारा आणि विमान हवेतच हेलकावे खाऊ लागलं. त्यामुळे या विमानतळावर विमान उतरवताना अडचणी आल्या. त्यामुळे लँडिंग करण्याचा निर्णय मागे घेतला आणि पुन्हा हवेत उड्डाण घेतलं. दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी विमान लँड होणार होतं. मात्र विमानाने पुन्हा एकदा 5 हजारापेक्षा जास्त उंचीवर पुन्हा उड्डाण सुरू केलं.
https://www.prahaar.in/2026/11/11/sachin-tendulkar-historic-bats-to-be-displayed-at-mumbai-cricket-museum-treat-for-fans/
विमान पुन्हा लँडिंग करण्यापूर्वी हवेत 26 मिनिटे घिरट्या घालत होतं. वारा शांत झाल्यानंतर वैमानिकाने पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न केला आणि त्याच तो यशस्वी झाला. विमान दुपारी 1 वाजून 6 मिनिटांनी लँडिंग झालं. नियोजित वेळेपेक्षा विमान 26 मिनिटे उशिराने लँड केलं गेलं. या प्रकारामुळे भारतीय खेळाडूंची धाकधूक वाढली होती. सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जाणार आहे.
Source: Prahaar News
