Hashtagintro

तुमच्या पक्षातील गोंधळ आम्हाला त्रासदायक, अमित शाह यांची राष्ट्रवादीतील गोंधळावर नाराजी, दिल्लीत काय घडलं?

तुमच्या पक्षातील गोंधळ आम्हाला त्रासदायक, अमित शाह यांची राष्ट्रवादीतील गोंधळावर नाराजी, दिल्लीत काय घडलं?

Amit Shah on NCP: अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. पक्षासमोरच नाही तर मित्रपक्षाच्या शीर्ष नेत्यांसमोरही राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते त्यांचे गऱ्हाणे मांडले आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि पवार कुटुंबियातील वाद समोर आला होता. आता पार्थ पवार यांच्या भूमिकेवरून पुन्हा वाद उफळला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष पदावरील नेमणुकीवरून ठिणगी पडली आहे. हा सर्व वाद दिल्ली दरबारी सुद्धा पोहचला आहे. नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे याविषयीची तक्रार केल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यात शाह यांनी राष्ट्रवादीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली. यामुळे सरकारवर परिणाम होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शाह यांचा देवगिरीसाठी थेट संदेश

झिशान सिद्दिकी आणि इतर नेमणुकीवरून राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. या नेत्यांनी आपल्याला त्यांची नियुक्ती झाल्याचे माध्यमातून कळल्याची प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार यांच्या निर्णयाविरोधात नेते नाराज झाले. त्यांना अमित शाह यांची भेट घेतली. त्यात पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते पद आणि इतर पदावर नियुक्ती करताना वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याचा तक्रारीचा सूर होता. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या घरी बैठक झाली. पुन्हा कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात वरिष्ठ नेत्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

या सर्व घडामोडींवर अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षातील वादाचा परिणाम सरकारवर होत असल्याचा स्पष्ट संदेश देवगिरीला कळवण्यात आला. कालच्या बैठकीत सुनील तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि इतर नेते उपस्थित होते.

सुनेत्रा पवारांनी बोलावली आमदारांची बैठक

दिल्लीतील नाराजी नाट्याचे सूर आता मुंबईतही उमटू लागले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. गेल्या चार महिन्यानंतर अशी बैठक होत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या बैठकीला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. आज संध्याकाळी सात वाजता देवगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिल्लीत, पक्षाच्या नेत्यांची आणि अमित शाह यांची भेट ही पूर्वनियोजीत असल्याचे सांगितले आहे. काही लोक मुद्दाम पक्षात दुफळी निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीत वाद असल्याचा खोडसाळपणा करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language