Hashtagintro

तुम्हाला बाळासाहेब ठाकरे शिव्या द्यायचे का? संजय राऊतांनी सगळं सांगितलं, म्हणाले…

तुम्हाला बाळासाहेब ठाकरे शिव्या द्यायचे का? संजय राऊतांनी सगळं सांगितलं, म्हणाले…

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक जुना किस्सा सांगितला. बाळासाहेब ठाकरे हे सुरुवातीला संजय राऊतांवर चिडचिड करायचे. त्यांना शिवीगाळ करायचे, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला. यावरच आता संजय राऊत यांनी भाष्य केलं. त्यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते दिल्लीत बोलत होते.

संजय राऊत हे रामलीला मैदानावर आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. संजय राऊत यांनी म्हटलं की, मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत चाळीस वर्षे काढली आहेत. माझ्या जन्मापासून मी पाहतो आहे.  बाळासाहेबांची तसबीर माझ्या घरात आहे. बाळासाहेब माझे मास्तर होते. ते माझ्यावर चिडले, हा त्यांचा आशिर्वाद होता. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांनी मला घडवलं आहे’.

इंडिया आघाडीच्या रॅलीवर संजय राऊत म्हणाले, ‘ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मॉक संसदीय अधिवेशन झालं. माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमारी या अध्यक्षस्थानी होत्या. त्यावेळी सगळे प्रमुख नेते होते. त्यानंतर एक मताने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला. हे सरकार आणि त्यांनी नेमलेले ज्ञानेश कुमार हे लोकशाहीचे शत्रू आहेत. ते खुर्चीला चिकटून आहेत. त्यामुळे त्यांना धक्के द्यावे लागतील. त्यामुळे तातडीने रामलीला मैदानावर संपूर्ण भारतातून लोक येताहेत. इंडिया आघाडीचा मोर्चा, त्यानंतर महारॅली रामलीला मैदानावर होणार आहे. ज्ञानेश कुमार यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. ज्ञानेश कुमार यांच्या खुर्चीला धक्का देण्यासाठी होईल. अशा प्रकारे सरकारवर दबाव टाकण्याचे काम सुरू राहील’.

‘भाजपच्या टीकेला अर्थ राहिली नाही. या देशात रावणलीला सुरू आहे. ही रावणलीला संपवण्यासाठी रामलीला मैदानाची निवड केली आहे. राहुल गांधी काय आहे, हे जनता ठरवेल. जनतेचा उद्रेक असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ज्ञानेश कुमार यांना मांडीवर घेऊन बसले आहेत. रावणाने देखील असे कृत्य केलं नसतं. रावण हा विद्वान होता. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. तो शिवभक्त होता. रावण हा उत्तम प्रशासक होता. सत्य आणि असत्याची लढाई होती. भाजपने रामायण नीट वाचलं पाहिजे. 2014 नंतर नवीन रामायण आलं, ते नाही.  त्याचा अर्थ समजून घेतलं पाहिजे. रामराज्याच्या नावाखाली रावणराज्य सुरू केलं आहे. ते संपवण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात एकवटले आहेत.  आमची सेना ही प्रभू श्रीरामाच्या प्रेरणेतून उभी राहिली आहे. रामाचा आशीर्वाद संपला. त्यांनी रामाच्या दानपेटीत चोऱ्या केल्या. त्यांनी अयोध्या लुटली. त्यांनी रामकथा संपली,  असे त्यांनी पुढे सांगितले.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language