1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लुटेरे' चित्रपटात पूजा बेदी यांनी बिकिनी परिधान केली होती. मुंबईतील क्रॉसवर्ड येथे 'फॉरएवर यॉर्स' नावाचा लिलाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कलाकारांनी वापरलेल्या कपड्यांसह विविध वस्तूंचा लिलाव करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पूरण सिंह यांनी केले होते. यावेळी पूजा बेदी यांच्या बिकिनीसाठी एका चाहत्याने 1500 रुपयांची बोली लावली. त्यानंतर त्याने ती बिकिनी विकत घेतली.
मात्र, त्या चाहत्याचा वेडेपणा एवढ्यावरच थांबली नाही. तो चक्क पूजा बेदी यांची बिकिनी घेऊन त्यांच्या घरी पोहोचला. त्याने असे का केले, असे विचारल्यावर तो म्हणाला, 'अगर मैं उन्हें गले नहीं लगा सकता, तो कम से कम उनकी बिकिनी को तो गले लगा सकता हूं।
पूजा यांनी सांगितले की, एके दिवशी तो चाहता थेट त्यांच्या घरात आला. त्यांनी त्याला बसवून शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्यास तयार नव्हता. पूजा यांचे लग्न होईपर्यंत हा प्रकार सुरू होता.
या चाहत्याने आपल्या आवडत्या परफ्यूम 'अनाइस-अनाइस'च्या नावावरून स्वतःचे नावही ठेवले होते. तो पूजांना वारंवार फोन करायचा आणि रक्ताने लिहिलेली पत्रेही पाठवायचा. पूजा बेदी यांनी 6 मे 1994 रोजी फरहान फर्निचरवाला यांच्याशी लग्न केले.
Source: TV9 Marathi Entertainment





