पहिल्या क्रमांकावर कर्नाटक – या यादीत कर्नाटक अव्वल स्थानी असून, वर्षाला सुमारे 6.9 कोटी दारूचे बॉक्स खपतात.
दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू – तामिळनाडूमध्ये TASMAC या सरकारी मद्यविक्री नेटवर्कच्या माध्यमातून वर्षाला जवळपास 6.4 कोटी दारूचे बॉक्स विकले जातात.
तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा – तेलंगणामध्ये 40 टक्क्यांहून अधिक पुरुष मद्यसेवन करतात, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. येथे वर्षाला सुमारे 3.7 कोटी दारूचे बॉक्स खपतात.
चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश – आंध्र प्रदेशमध्ये वर्षाला जवळपास 3.5 कोटी दारूचे बॉक्स वापरले जातात. त्यामुळे हे राज्य यादीत चौथ्या स्थानावर आहे.
पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र – देशात सर्वाधिक दारू विक्री होणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असून, वर्षाला सुमारे 2.7 कोटी दारूचे बॉक्स खपतात, असा अहवालामध्ये दावा करण्यात आला आहे.
Source: TV9 Marathi National





