पायल रोहतगीसाठी 'बिग बॉस 2' हा शो महत्त्वाचा ठरला. शोमधील लव्ह अँगल आणि वादांमुळे तिला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली.
शोनंतर आलेल्या अनुभवांमुळे पायल नैराश्यात गेली होती. एका शोमध्ये तिनं सांगितलं होतं की, तिला स्वतःची ओळख दुय्यम कलाकारासारखी वाटू लागली होती. याचा तिच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला.
नैराश्याच्या काळात पायलला मद्यपानाचं व्यसन लागलं होतं. ती सलग 48 तास दारू प्यायची, असा खुलासा तिनं केला होता. याशिवाय ती औषधं आणि धूम्रपानावरही अवलंबून राहू लागली होती.
एकटेपणा आणि नैराश्यामुळे पायलच्या मनात आयुष्य संपवण्याचे विचार येत होते. तिनं स्वतःला इजा पोहोचवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, रिहॅब सेंटरमध्ये जाऊन वैद्यकीय उपचार घेत तिनं पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू केलं.
या कठीण काळात संग्राम सिंह तिच्या आयुष्यात आला. त्यानं पायलला मानसिक आधार दिला आणि व्यसनापासून दूर राहण्यासाठी मदत केली. अनेक वर्षांच्या लिव्ह-इन नात्यानंतर दोघांनी 2022 मध्ये लग्न केलं. 'लॉक अप' शोमध्येही पायलनं आपल्या संघर्षासह वंध्यत्वाच्या मुद्द्यावर मोकळेपणाने भाष्य केलं होतं.
Source: TV9 Marathi Entertainment





