Hashtagintro

दिवाळीत मिठाई घेताना सावधान, तुकाराम मुंढेंनी थेट दिला इशारा, म्हणाले, भडक, सोन्याचा वर्ख…

दिवाळीत मिठाई घेताना सावधान, तुकाराम मुंढेंनी थेट दिला इशारा, म्हणाले, भडक, सोन्याचा वर्ख…

आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. त्यामुळे दुकानांमधून मिठाई आणि खवा विकला जात आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि खव्याची विक्री होणार आहे. त्यापूर्वीच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढीच मिठाई खरेदी करावी. दोन किंवा तीन दिवसांपेक्षा अधिक काळ दुकानात असलेली खवा मिठाई खरेदी करू नका. मिठाई किंवा खवा खरेदी करताना सावधगिरी बाळगा, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केंलं आहे. नामांकित आणि लेबल असलेली मिठाई आणि खवाच खरेदी करा, असं सांगतनाच जर काही संशयित किंवा भेसळ संदर्भात तक्रार असेल तर एफडीएला कळवा, आम्ही योग्य ती कारवाई करू, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तसेच मिठाई आणि इतर मिठाई दुकान आस्थापनांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बनावट मिठाई अशी ओळखा

जास्त कलर, भडक रंग असलेली मिठाई खरेदी करू नका. पाकिटावर मिठाई किंवा खव्याच्या निर्मितीची तारीख असेल तरच खरेदी करा. सोन्याच्या वर्ख, चांदीचा वर्ख असलेल्या मिठाई बाबत काळजी घ्या. चांदीचा वर्ख तपासूनच घ्या. वर्ख हातात घेतला आणि तो विरघळला तर तो योग्य. मात्र जर त्याची फॉईल बनत असेल तर तो अल्युमिनियम फॉईल आहे म्हणून समजायचे. त्यामुळे चांदी किंवा सोन्याचा वर्ख असलेली मिठाई घेताना काळजी घ्या, असं आवाहन मुंढे यांनी केलं आहे.

मुंढेंची धडक कारवाई

नागरिकांचं आरोग्य उत्तम राखणं हे आमचं काम आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात आपण राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. एकूण 954 लायसेन्स आपण निलंबित केले आहेत. 64 कोटी 45 लाख किंमतीचा अन्न साठा जप्त केला आहे. 1 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबरपर्यंतची ही कारवाई आहे. 9667 अन्न अस्थापनाची आपण तपासणी केली आहे. 4603 आस्थापनांना नोटीस दिली आहे. 8835 अन्न नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. 398 टन अन्न साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

■ दिवाळीतील कारवाई

●15 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान 3332 अन्न आस्थापनांची तपासणी

● 1501 आस्थापनांना नोटीस

● 326 लायसन्स निलंबित केले आहेत

● 15 परवाने रद्द केले आहेत

● 1828 टन अन्नसाठा जप्त केला आहे

● दिवाळी संदर्भात परराज्यातून आलेला खवा, मावा, दूध, पनीर, खाद्य तेल, खाद्य रंग आणि इतर वस्तूंची तपासणी केली गेली आहे

Source: TV9 Marathi Health

Read full article on TV9 Marathi Health

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language