Hashtagintro

देख रहा है ना बिनोद…पंचायत सिझन 5 चा प्रोमो समोर, इंग्लंडचा केविन पीटरसनही झळकला, पाहा Video

देख रहा है ना बिनोद…पंचायत सिझन 5 चा प्रोमो समोर, इंग्लंडचा केविन पीटरसनही झळकला, पाहा Video

Kevin Pietersen Panchayat Movie: सर्वजण लोकप्रिय वेब सिरीज ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा नवीन सीझन ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत फक्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याने आधीच चर्चा निर्माण केली आहे. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन देखील या सिरीजच्या कलाकारांमध्ये सामील झाला असून तो फुलेरा येथे दाखल झाला आहे. पीटरसन पूर्णपणे देसी स्टाईलमध्ये दिसत आहे.

सिरीजच्या निर्मात्यांनी पीटरसनचा एक प्रमोशनल व्हिडिओ प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये तो सिरीजच्या मुख्य पात्रांशी गप्पा मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पीटरसन कुर्ता-पायजमा घातलेला आणि डोक्याला फेटा बांधलेला दिसत आहे. प्राइम व्हिडिओवर येणाऱ्या या सिरीजचा हा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पीटरसन फुलेराच्या लोकांना भेटतो आणि त्यांचे कौतुक करतो.

केविन पीटरसन म्हणतो की, “मी लंडनपासून सिडनीपर्यंत फिरलो आहे, पण फुलेरासारखी जागा मी कधीही पाहिली नाही.”  तो फुलेराचे नवीन प्रमुख, भूषण यांच्यासोबत चहा पिताना दिसत आहे. जो कोणी हा प्रोमो पाहतो, तो ‘फुलेरा’चे निर्माते आणि पीटरसन या दोघांचेही कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. या प्रोमोमध्ये पीटरसन बहुतांशी हिंदीत बोलतो आणि मालिकेतील प्रसिद्ध संवाद, “आलुवा मीटिंग” म्हणतानाही दिसतो.

प्राइव्ह व्हिडिओने हा प्रोमो त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर प्रसारित केला आहे. यावर त्यांनी दिलेल्या कॅप्शनची आता जोरदार चर्चा सुरु आहे. “बघितलं बिनोद, केवीन पिटरसनजीचे किती प्रेम आहे फुलेरावर.”

पीटरसनला भारताविषयी खूप आपुलकी आहे. तो अनेकदा हिंदीत पोस्ट करताना दिसतो. ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनच्या प्रोमोच्या शूटिंगचा त्याने पुरेपूर आनंद घेतला आणि मालिकेतील जावई भूषणसोबतचा एक फोटो त्याच्या एक्स हँडलवर “पंचायत” या कॅप्शनसह पोस्ट केला.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language