Hashtagintro

नाना पाटेकर यांनी नातीच्या कानात अजान पढवली होती? फोटो व्हायरल

नाना पाटेकर यांनी नातीच्या कानात अजान पढवली होती? फोटो व्हायरल

अभिनेते नाना पाटेकर यांचं अचानक जाणं सर्वांसाठी धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. नानांचा असंख्य मित्र परिवार होता. त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. एक अभिनेता म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून नानांची मोठी ओळख होती. त्यामुळेच त्यांना मानणारा वर्ग मोठा होता. नाना गेल्यानंतर त्यांचे मित्र आणि चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अनेकजण नाना पाटेकर यांच्या बाबतच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यातील काही गोष्टी बरोबर आहेत. तर काही चुकीच्या आहेत. नानांच्या नावावर चुकीच्या गोष्टी खपवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नाना पाटेकर यांनी म्हणे, त्यांच्या नातीच्या कानात अजान पढवल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत नानांच्या कडेवर एक छोटं मूल आहे. ती त्यांची नात असल्याचं सांगितलं जात आहे. आणि एक मदरशामधील शिक्षक या छोट्या मुलीच्या कानात अजान पढताना दिसत आहे. नानांनी आपल्या नातीच्या कानात अजाण पढवल्याचं सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे. सोबत हा फोटो पुरावा म्हणून दाखवला जात आहे. हा फोटो इतका ओरिजनल वाटतो की, नानांनी खरोखरच नातीच्या कानात अजाण म्हटली असावी असं वाटतंय. पण वास्तव वेगळं आहे. फॅक्ट चेक केली असता वेगळीच गोष्ट समोर आली आहे.

व्हायरल काय?

खुर्शीद नावाच्या एक्स अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी परंपरेची पर्वा न करता इस्लाम आणि अजानबाबत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यांनी जाहीरपणे आपलं प्रेम व्यक्त केल्याने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

तर आजम खान या नेटकऱ्याने, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी नातीच्या कानात अजान पढवली, असं म्हटलं आहे.

Void cosmic commentry नावाच्या अकाऊंटवर, बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी कशाचीच पर्वा न करता जाहीरपणे इस्लाम आणि अजानच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करून सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे, असं म्हटलंय.

 

फॅक्ट काय?

नाना पाटेकर यांनी खरोखरच त्यांच्या नातीच्या कानात अजाण म्हटलीय का? हे पडताळण्यासाठी संबंधित किवर्ड्सने गुगलवर सर्च करण्यात आलं. पण तशी कोणतीही बातमी किंवा कंटेट मिळाला नाही. तसा कोणताही व्हिडीओ मिळाला नाही. तसेच नाना पाटेकर किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी कधी त्यावर भाष्य केलेलंही आढळलं नाही. तसेच फोटोत दिसणाऱ्या शिक्षकानेही तसा दावा केल्याचं कुठेही दिसून आलं नाही. याचाच अर्थ सोशल मीडियावर व्हायरल होणारा कंटेट आणि फोटो चुकीचा आहे, हे स्पष्ट होत आहे.

nana patekar

nana patekar

दरम्यान, नाना पाटेकर यांचा लहान मुल कडेवर घेतलेला फोटो फेक असल्याचं दिसून आलं आहे. हा फोटो एआय जनरेटेड आहे. नानांचा एक जुना फोटो घेऊन त्यावरून हा फोटो तयार करण्यात आला आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language