Source: Prahaar News
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपणार का? वेलिंग्टनमधील रेकॉर्ड पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. पण रोहित शर्मासाठी हा सामना काही खास गेला नाही. रोहित शर्माच्या पदरी पहिल्याच सामन्यात निराशा पडली. रोहित शर्मा खातंही खोलू शकल नाही. (Photo: ANI)
रोहित शर्मा पहिल्या वनडे सामन्यात फेल गेल्यानंतर आता दुसऱ्या वनडे सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे. त्यामुळे मागची आकडेवारी पाहून रोहित शर्मा चांगली कामगिरी करेल का? याबाबत शंका आहे. (Photo: ANI)
पहिल्या सामन्यातील अपयशानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात क्रीडाप्रेमींचं लक्ष रोहित शर्माच्या कामगिरीवर असेल. आकडेवारीनुसार, रोहित शर्मा वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियममध्ये दोन सामने खेळला. एक वनडे आणि दुसरा टी20 सामना खेळला. वनडे सामन्यात त्याने 4, तर टी20 सामन्यात फक्त 1 धाव करून बाद झाला होता. (Photo: ANI)
रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळायचं असेल तर सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणं भाग आहे. जर रोहित शर्माला संधी मिळूनही चांगली कामगिरी करता आली नाही तर संघात स्थान मिळणं कठीण होईल. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात कमबॅक करण्याचा दबाव त्याच्यावर असेल. (Photo: ANI)
पहिल्या वनडे सामन्यात सलामीला आलेल्या रोहित शर्माला वेगवान चेंडूंचा सामना करताना अडचणीचं गेलं होतं. पावसामुळे खेळपट्टीचं चित्रच बदललं होतं. आता वेलिंग्टनमध्येही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रोहित शर्माला नव्या चेंडूचा सामना करणं कठीण जाण्याची शक्यता आहे. (Photo: ANI)
Read full article on Prahaar News