Hashtagintro

पहाटे 4.30 वाजता अलार्म वाजला, आई उठवायला गेली पण… ‘बंधन साथ जनमों का’ फेम लोकप्रिय अभिनेत्याचं निधन

पहाटे 4.30 वाजता अलार्म वाजला, आई उठवायला गेली पण… ‘बंधन साथ जनमों का’ फेम लोकप्रिय अभिनेत्याचं निधन

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनाची बातमी रविवारी येऊन धडकली. त्यामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. ही बातमी ताजी असतानाच आणखी एक बातमी येऊन धडकल्याने सर्वच हादरून गेले. ‘बंधन साथ जनमों का’ फेम मालिकेचा अभिनेता अनुज ठाकूर याचं निधन झालं. त्यामुळे त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनुज केवळ 30 वर्षाचा होता. अवघ्या तिसाव्या वर्षी अनुजने जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला असून टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

अनुज ठाकूरचे अत्यंत जवळचे मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर रुपेश सोनार यांनी ही दु:ख माहिती दिली आहे. 10 दिवसापूर्वीच माझं अनुजशी बोलणं झालं होतं. त्यावेळी तो अत्यंत आनंदात होता. पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तो उत्सुक होता. पण असं काही होईल आणि हा त्याच्या सोबतचा शेवटचा संवाद होता असं काही वाटलं नव्हतं, असं रुपेश सोनार यांनी सांगितलं.

मी अनुजला 2008 पासून ओळखत होतो. ‘बंधन साथ जनमों का’ या टीव्ही शोच्यावेळी आमची भेट झाली होती. त्यासोबतच आम्ही त्याच्यासोबत अनेक शो केले होते, असं रुपेश यांनी सांगितलं. रुपेश हे अनुजला केवळ मित्रच नव्हे तर आपल्या छोट्या भावासारखे मानत होते.

झोपेतच काळाची झडप

30 ऑक्टोबर रोजी मला रात्री 8.30 वाजता आमच्या एका कॉमन मित्राचा फोन आला होता. त्याने अनुजच्या निधनाची माहिती दिली. अनुजच्या निधनाची बातमी ऐकून सुरुवातीला मला विश्वास बसला नाही. कारण काही दिवसांपूर्वीच आमची भेट झाली होती. त्यानंतर मी अनुजच्या भावाला फोन केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयाला भेटायला गेलो. तिथे गेल्यावर त्याला झोपेतच हार्ट अटॅक आल्याचं कळलं, असं रुपेश म्हणाले.

रोज पहाटे 4.30 वाजता उठायचा

रुपेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज रोज पहाटे 4.30 वाजता उठायचा. तो आपल्या फिटनेसची काळजी घ्यायचा. रोज नियमितपणे जॉगिंग करायचा. पण त्या दिवशी पहाटे त्याचा अलार्म वाजत राहिला. पण तो उठला नाही. जेव्हा त्याच्या आईला जाग आली तेव्हा ती त्याच्या केबिनमध्ये गेली. तेव्हा अनुजचं निधन झाल्याचं आढळून आलं. अनुज सकाळी रोज लवकर उठायचा. पहाटे साडे चारला उठल्यावर तो आपलं रुटीन फॉलो करायचा. त्यात फिटनेस आणि जॉगिंगचा समावेश आहे. पण त्या दिवशी तो उठलाच नाही. अलार्म वाजत होता. पण त्याचे श्वास बंद झाले होते.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language