Hashtagintro

पासवर्डपासून सरकारी आयडीपर्यंत, 350 कोटींचा डेटा लीक! तुमचीही माहिती धोक्यात?

पासवर्डपासून सरकारी आयडीपर्यंत, 350 कोटींचा डेटा लीक! तुमचीही माहिती धोक्यात?

जागतिक स्तरावर डेटा सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा डेटा चोरीची घटना समोर आली आहे. सायबर सुरक्षा संशोधकांनी डेटा चोरीच्या दोन मोठ्या घटना उघड केल्या आहेत. या घटना अतिशय चिंताजनक आहेत. कारण या दोन घटनांमध्ये मिळून ३.५ अब्जाहून अधिक रेकॉर्ड्सचा समावेश आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये ईमेल पत्ते, युजरनेम्स, पासवर्ड, फोन नंबर, सरकारी ओळख क्रमांक आणि वैयक्तिक डॉक्युमेंटचा समावेश आहे. अहवालानुसार, एका डेटाबेसमध्ये सुमारे २ अब्ज लॉगिन रेकॉर्ड्स आहेत, तर दुसऱ्या डेटाबेसमध्ये चीनशी संबंधित १.६४ अब्ज रेकॉर्ड्स आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका डेटाबेसमध्ये सुमारे २ अब्ज लॉगिन नोंदी आहेत, तर दुसऱ्या डेटाबेसमध्ये चीनशी संबंधित १.६४ अब्ज नोंदी आहेत. सायबर गुन्हेगार या माहितीचा वापर करून खात्यांशी सहज छेडछाड करू शकतात. एवढं काय आयडेंटिटी थेफ्ट करू शकतात आणि ऑनलाइन फसवणूक घडवून आणू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

सर्वात मोठी डेटा चोरी!

‘वायर्ड’च्या एका अहवालानुसार, या दोन घटना वेगवेगळ्या सायबर सुरक्षा संशोधकांद्वारे शोधून काढण्यात आल्या होत्या. एका डेटाबेसमध्ये चीनशी संबंधित १.६४ अब्ज रेकॉर्ड्स होते तर, दुसऱ्या डेटाबेसमध्ये इतर विविध देशांतील सुमारे २ अब्ज लॉगिन रेकॉर्ड्स होते.

मालवेअरद्वारे 2 अब्जांहून अधिक रेकॉर्ड चोरीला

सायबर सुरक्षा संशोधकांना दोन मोठे डेटा लीक प्रकरणे आढळली आहेत. पहिल्या प्रकरणात सुमारे 2 अब्ज लॉगिन रेकॉर्ड उघड झाले असून, त्यात ईमेल, पासवर्ड, युजरनेम, कुकीज आणि वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. हा डेटा इन्फोस्टीलर मालवेअरद्वारे चोरीला गेला असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या प्रकरणात चीनशी संबंधित 1.64 अब्ज रेकॉर्ड असलेला डेटाबेस आढळला. यात राष्ट्रीय ओळख क्रमांक, फोन नंबर, विद्यार्थ्यांची माहिती आणि व्यावसायिक नोंदींचा समावेश होता. विशेष म्हणजे, हा डेटाबेस कोणत्याही पासवर्डशिवाय पाहता येत होता.

या चोरीच्या माहितीचा वापर बनावट ओळख तयार करणे, अकाउंट हॅक करणे आणि ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी होऊ शकतो. यामुळे जगभरातील डेटा सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language