Hashtagintro

पेन्शन स्टेट्‍स ऑनलाईन कसं तपासणार? EPFO ची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

पेन्शन स्टेट्‍स ऑनलाईन कसं तपासणार? EPFO ची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

EPFO Pension Status: निवृत्तीनंतर पेन्शनधारकांना त्यांच्या निवृत्तीची रक्कम, क्लेमची सध्या सध्यस्थिती, पैसे कधी जमा होतील याविषयीच्या माहितीसाठी ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनधारकांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. त्यांना ऑनलाईन पद्धतीने पेन्शन स्टेट्‍स तपासता येईल. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही प्रक्रिया सोपी आहे.

असे तपासा ऑनलाईन पेन्शन स्टेट्स

ईपीएफओच्या मार्गदर्शक तत्वानुसार, पेन्शनधारक खालील सोप्या टप्प्यांआधारे त्यांच्या पेन्शनची स्थिती तपासू शकतात. त्यासाठी ही प्रक्रिया टप्प्या टप्प्याने पूर्ण करणे गरजेचे आहे.

१. सर्वात अगोदर ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर epfindia.gov.in वर जा

२. मुख्य पृष्ठावरील Online Services यावर जाऊन Pensioners Portal हा पर्याय निवडा

३. नवीन पेज उघडल्यावर त्या ठिकाणी Know Your Pension Status हा पर्याय निवडा

४. त्यानंतर संबंधित कार्यालय, कार्यालयीन आयडी आणि तुमचा पीपीओ क्रमांक बिनचूक नोंदवा

५. सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर Get Status यावर क्लिक करा. लागलीच पेन्शन पेमेंट आणि सद्यस्थितीचा तपशील स्क्रीनवर दिसून येईल

ईपीएफओ पासबुक आणि क्लेम स्टेट्‍सचाही पर्याय

ज्या सदस्यांनी पेन्शन क्लेमसाठी अर्ज केला आहे. ते UAN आणि पासवर्डच्या मदतीने पोर्टल आणि उमंग (Umang) अॅपद्वारे क्लेमची स्थिती तपासू शकतात. डिजिटल सेवांमुळे पेन्शन वितरण प्रक्रियेत मोठी पारदर्शकता आली आहे. बँक खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब झाल्यास त्यामागील कारणंही समोर येईल.

पेन्शनधारकांनी लक्षात ठेवा ही गोष्ट

पेन्शन सुरळीत सुरू राहण्यासाठी पेन्शनधारकांनी आपले वार्षिक जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ईपीएफओ कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरलेली नाही.

पेन्शनधारकांनी बँक खाते, आधार तपशील अद्ययावत ठेवा

पीपीओ क्रमांक लक्षात ठेवा. तो कुठेतरी जतन करून ठेवा

ईपीएफओकडून वेळोवेळी येणार्‍या सूचना आणि माहितीकडे लक्ष ठेवा

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language