Hashtagintro

प्रदर्शनापूर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटाची चर्चा, 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये कोरलं नाव

पुणे: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ईठा’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. चित्रपटामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिका साकारणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चेत राहिलेला ‘ईठा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यापूर्वीच एक मोठा विक्रम रचला आहे. चित्रपटातील पहिल्या ‘जी जी रे जी’ गाण्यावर एका मिनिटात सर्वाधिक महिला कलाकारांनी एकत्र येत, लावणीची हुक स्टेप्स सादर करत रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/25/archit-the-child-actor-from-killa-now-in-zhimma-3-hemant-dhome-offers-a-special-opportunity/
सर्व महिला कलाकारांनी गाण्याच्या हुकस्टेप्स करत, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ असे दोन्हीही रेकॉर्ड्स मोडत आपले स्थान प्रस्थापित केले आहे. या खास विक्रमी सोहळ्याचे आयोजन पुण्यातील झील युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आले होते. मराठमोळी नऊवारी नेसून अनेक महिला आणि तरूणींनी एकत्र येत, सर्वांनी लावणीच्या तालावर सोशल मीडियावर सर्वांचेच मन जिंकले आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी स्वतः अभिनेत्री श्रद्धा कपूर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्या करिश्मा शर्मा उपस्थित होते. विक्रम नोंदवल्यानंतर रेकॉर्ड बुक्सच्या अधिकाऱ्यांनी मंचावरून अधिकृत घोषणा करत मॅडॉक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कठपुतली क्रिएशन्स महाराष्ट्र यांना या सन्मानाने गौरवले.
 

 

View this post on Instagram

 
A post shared by Ramakant Munde (@mundenews)

अभिनेत्री श्रद्धा कपूर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमला प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर श्रद्धा कपूरने कार्यक्रमातील चिमुकल्या स्पर्धकांसोबत आणि तरुणींसोबत गाण्यावर ठेका धरला. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ऐतिहासिक क्षणासाठी श्रद्धा कपूर अस्सल महाराष्ट्रीयन पेहरावात दिसत होती. तिने परिधान केलेली पाचूसारख्या हिरव्या रंगाची नऊवारी साडी, त्यावरील नक्षीकाम, तांबूस- पीच पदर आणि रुंद काठ यामुळे तिचा लूक उठून दिसत होता. हा साज अधिक आकर्षक करण्यासाठी तिने चांदीचा चोकर, झुमके, नथ, बांगड्या, कंबरपट्टा, पायात घुंगरूचे पैंजण आणि कोल्हापुरी चप्पल असा पारंपरिक श्रृंगार केला होता. केसात लाल फुलांचा गजरा आणि कपाळावर टिकली लावून तिने मंचावर लावणीची झलक सादर करत वातावरणात उत्साह निर्माण केला.
https://www.prahaar.in/2026/11/25/miss-universe-2026-winner-puerto-rico-jennifer-barreto-mother-of-7-year-old-daughter-creates-history-at-75th-pageant/
चित्रपटाविषयी बोलायचे तर, ‘ईठा’ चित्रपट महाराष्ट्रातील ज्येष्ठ तमाशा आणि लावणी कलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांच्या जीवनप्रवासावर आणि कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेवर आधारित आहे. 17 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जी जी रे जी’ या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले असून, अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याला शब्द दिले आहेत. श्रेया घोषालच्या आवाजातील या गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चेंट यांनी केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश व्हिजान, लक्ष्मण उतेकर आणि करिश्मा शर्मा निर्मित चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, मोहम्मद झीशान अय्यूब आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारतासह संपूर्ण जगभरामध्ये 4 डिसेंबर 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language