Hashtagintro

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीचं निधन; भावूक व्हिडीओ शेअर करत म्हणाले, आपलं मूल या जगातून..

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीचं निधन; भावूक व्हिडीओ शेअर करत म्हणाले, आपलं मूल या जगातून..

मनोरंजनविश्वातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आदित्य कृपलानी यांच्या मुलीचं कर्करोगामुळे निधन झालं आहे. अनुराधा पांडे असं त्यांच्या मुलीचं नाव असून ती स्टेज 4 ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. मुलीच्या निधनाची बातमी स्वतः आदित्य यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ शेअर करत दिली. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलीला गमावण्याचं दुःख व्यक्त केलं आहे. त्यांचे शब्द ऐकून अनेक जण भावूक झाले आहेत. आदित्य कृपलानी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘जगातील सर्वात चांगली मुलगी. आमच्यासाठी…’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओमध्ये ते सांगतात की, ही बातमी नेमकी कशी सांगावी, हेच त्यांना समजत नव्हतं.

ते म्हणाले, जेव्हा तुमच्या मुलाला किंवा मुलीला कर्करोगाचं निदान होतं आणि तोही स्टेज 4 ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार असतो, तेव्हा मनात एकच आशा असते की आपल्या मुलाला काही होणार नाही. तिच्यासोबत ‘सर्कल ऑफ लाइफ’सारखी गाणी ऐकतानाही आम्ही हाच विचार करायचो की आपलं मूल या जगातून जाणार नाही. आपल्याला हा दुःखद प्रसंग सहन करावा लागणार नाही, अशीच आशा होती.

पुढे आदित्य यांनी मुलीला गमावण्याचं दुःख व्यक्त करताना सांगितलं की, जगात अनेक लोकांनी आपली मुलं, भावंडं आणि जवळची माणसं गमावली आहेत. मात्र, असं काही आपल्यासोबतही घडू शकतं, हे स्वीकारणं कोणालाही शक्य होत नाही. पण अखेर आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की, ज्या कुटुंबांनी कर्करोगामुळे आपल्या मुलांना गमावलं, त्यांनीही आपल्यासारख्याच वेदना अनुभवल्या असतील. अनुराधा आता आपल्यासोबत नाही, असं सांगताना त्यांनी लोकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं. आपल्या आजूबाजूचं वातावरण, आनंदी राहण्याची वृत्ती, शारीरिक सवयी आणि खाण्यापिण्याच्या सवयी याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Kripalani (@adityakripalani)

आदित्य यांनी कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही एक महत्त्वाचा संदेश दिला. तुम्ही एकटे नाहीत. अनेक लोक या वेदनादायी परिस्थितीतून जात असतात. तुमचं दुःख खरं आहे आणि जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर होणारं दुःखही तितकंच वास्तविक आहे, असं ते म्हणाले.

अनुराधाशी आदित्य आणि त्यांच्या पत्नी श्वेता कृपलानी यांचं रक्ताचं नातं नव्हतं. मात्र, त्यांच्यात मुलगी आणि पालक असं अतिशय घट्ट नातं निर्माण झालं होतं. त्यांनी तिला आपल्या मुलीप्रमाणेच स्वीकारलं होतं. तिच्या निधनानंतर आदित्य आणि श्वेता यांनी प्रेम आणि माणुसकीच्या भावनेनं पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, आदित्य कृपलानी यांनी ‘टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब’, ‘नॉट टुडे’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी अनुराधाला श्रद्धांजली वाहिली असून कृपलानी कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language