Hashtagintro

बिस्किटाचा पुडा तरी घेऊन जाता का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर बोचरी टीका

मुंबईत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाचं राजकारण करणाऱ्या विरोधकांना खडे बोल सुनावले. मुंबईतील दसऱ्या मेळाव्यात त्यांनी आरोप करणाऱ्यांवर तोंडसुख घेतलं. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठं मन लागतं असंही सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘रोज तुम्ही आम्हाला शिव्या देता. रोज आरोप करता. तुमचा एकही दिवस एकनाथ शिंदेला शिव्या दिल्याशिवाय जात नाही. पण मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही आम्हाला शिव्या द्या. पण आम्ही शेतकऱ्यांना शिधा देण्याचं काम सुरू केलं आहे. तुम्ही शिव्या द्या, आरोप करा, पण आम्ही त्या आरोपांना आरोपाने उत्तर देणार नाही. आम्ही कामातून देणार..’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ‘कुठल्या तोंडाने तुम्ही आमच्यावर आरोप करतात. ट्रकच्या ट्रक भरून पाठवायला हिंमत लागते, मोठं मन लागतं. तुम्ही आमच्यावर टीका करता. बिस्किटचा पुडा तरी घेऊन जाता का? तेवढा तरी घेऊन जा.’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मी दिल्लीला गेला आणि पंतप्रधान मोदींना भेटलो. त्यांनी दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत माहिती घेतली. अमित शाह यांनीही माहिती घेतली. पंतप्रधान मला म्हणाले की, शिंदेजी चिंता करू नका. आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभे आहोत. अमित शाह देखील म्हणाले की चिंता करू नका. शेतकऱ्यांसोबत राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहेत. शेतकरी संकटात आहे आणि त्या संकटाचं तुम्ही राजकारण करता. कुठे फेडणार हे पाप. शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळता. हे शेतकरी प्रेम आहे.’

https://www.prahaar.in/2026/10/20/shiv-sena-stands-firmly-behind-drought-affected-farmers-do-not-worry-an-assurance-from-deputy-chief-minister-eknath-shind/
‘वोट चोरीचं फेक नरेटिव्ह पसरवत आहात’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावत म्हणाले की, ‘शेतकऱ्यांची उभी पिकं करपत असताना मुंबईत मोर्चे काढत आहात. वोट चोरीचं फेक नरेटिव्ह पसरवत आहात. आम्ही शेतकऱ्यांना काय दिलं आहे ते एकदा बघा आणि तुम्ही काय दिलं ते बघा.. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही तुमची स्थिती सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ‘

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language