Hashtagintro

बीडमध्ये तलाठ्यावर जीवघेणा हल्ला; गावगुंडाने वि‍टेने डोकं फोडलं, नंतर मांडीला…संपूर्ण गाव हादरलं

बीडमध्ये तलाठ्यावर जीवघेणा हल्ला; गावगुंडाने वि‍टेने डोकं फोडलं, नंतर मांडीला…संपूर्ण गाव हादरलं

राज्यातील विविध भागात महावितरण अधिकारी असो वा सरकारी अधिकाऱ्यांना जीवघेण्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे.  त्यात बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढू लागली आहे. याच बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात एका तलाठ्यावर गावगुंडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. तलाठ्यावरील हल्ल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे.

नेमकं काय घडलं?

बीडमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत तलावातील अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वाकडीत ही घटना घडली. तलावावर अवैधरित्या पाणी उपसा करण्यासाठी बसवलेल्या मोटारींचे स्टार्टर काढून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यासाठी आलेल्या तलाठ्याला ज्ञानेश्वर मुकुंदराव कांदे याने शिवीगाळ करत मारहाण केली.

एवढंच नाही तर विटेने डोकं फोडून गंभीर जखमी केलं आणि चक्क तलाठ्याच्या डाव्या मांडीला पाठीमागून चावा घेतला. यापुढे नोकरी कशी करतोस, अशी धमकीही दिली. या हल्ल्यात तलाठी बैकरे राजपाल हे जखमी झाले आहेत.तर  या प्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

वाल्मिक कराडच्या मुलावर गुन्हा दाखल 

सोलापुरात वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर कोर्टात गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. सोलापूर कोर्टाने ही घटना बीडमध्ये घडल्याने त्याबाबत आपण आदेश देऊ शकत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते.  त्यानंतर पिडीत महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.  मात्र त्यानंतर खंडपीठाकडून सुनावणी होण्यापूर्वी सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी काल मध्यरात्री गुन्हा दाखल केलाय. सोलापूरमध्ये गुन्हा दाखल करुन परळी पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आलाय. आता बीडच्या परळीत गुन्हा वर्ग करण्यात आल्याने वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language