Hashtagintro

बॉबी देओलच्या एका सल्ल्यामुळे बदललं आयुष्य; ‘तारक मेहता..’मध्ये अभिनेत्याला मिळाली मोठी भूमिका

बॉबी देओलच्या एका सल्ल्यामुळे बदललं आयुष्य; ‘तारक मेहता..’मध्ये अभिनेत्याला मिळाली मोठी भूमिका

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मात्र, मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या सचिन श्रॉफ यांना प्रेक्षकांच्या अपेक्षांना सामोरं जावं लागलं. आता सचिन श्रॉफ यांनी या मालिकेत काम करण्याचा निर्णय कसा घेतला, याबाबत मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, बॉबी देओलच्या एका सल्ल्यामुळे त्यांनी ही ऑफर स्वीकारली होती. सचिन श्रॉफ यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत काम करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. ‘आश्रम’ या वेब सीरिजचं शूटिंग संपल्यानंतर ते अभिनेता बॉबी देओलसोबत बसले होते. त्यावेळी सचिन यांना या मालिकेची ऑफर मिळाली होती.

सचिन यांनी बॉबीला याबाबत सांगितलं असता, बॉबीने त्यांना ही लोकप्रिय मालिका असल्याचं सांगितलं. तसेच निर्मात्यांना भेटून भूमिका स्वीकारण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला. बॉबीच्या या सल्ल्यानंतर सचिन यांनी मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांची भेट घेतली. काही बैठकींनंतर त्यांनी मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला. सचिन श्रॉफ यांनी सांगितलं की, सुरुवातीला त्यांना ही ऑफर स्वीकारावी की नाही, याबाबत संभ्रम होता. कारण शैलेश लोढा यांनी अनेक वर्षे तारक मेहताची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांच्या जागी येणाऱ्या कलाकाराची तुलना होणार, हे निश्चित होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by sacchinshrof (@sachinshroff1)

मात्र, निर्माते असित मोदी यांनी त्यांची भीती दूर केली. त्यांनी सचिन यांना स्वतःच्या शैलीत भूमिका साकारण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे त्यांनी आपल्या पद्धतीने तारक मेहताची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. सचिन यांनी सांगितलं की, मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आपल्या कुटुंबाला ही बातमी दिली. त्यानंतर बॉबी देओलला फोन करून आपण ही ऑफर स्वीकारल्याचं सांगितलं. बॉबीने त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

शैलेश लोढांशी होणाऱ्या तुलनेबद्दल बोलताना सचिन म्हणाले की, त्यांना या तुलनेचा त्रास होत नाही. शैलेश लोढा यांनी तारक मेहताच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला होता. त्यामुळे प्रेक्षकांनी तुलना करणं स्वाभाविक आहे. उलट, अशा तुलनेमुळे कलाकाराला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळते, असंही त्यांनी सांगितलं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language