Hashtagintro

बॉलिवूडचा प्रसिद्ध सेलिब्रिटी, CCTV मध्ये दिसल्या धक्कादायक घडामोडी, जागीच सोडले प्राण… पोलिसांचा रिपोर्ट समोर

बॉलिवूडचा प्रसिद्ध सेलिब्रिटी, CCTV मध्ये दिसल्या धक्कादायक घडामोडी, जागीच सोडले प्राण… पोलिसांचा रिपोर्ट समोर

बॉलिवूडमध्ये छोटी जरी घटना घडली तरी, संपूर्ण जगात त्याची चर्चा सुरु होते. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. आता देखील असंच काही आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी असं निधन आलं, ज्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. सध्या ज्या सेलिब्रिटीची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नसून दिग्दर्शक संजय गुप्ता आहे. संजय यांच्या निधनाने सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. 30 ऑक्टोबर रोजी मुंबईतील राहत्या घरात त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या प्राथमिक माहितीनुसार, बाथरुममध्ये घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचं निधन झालं. पण सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेलं फुटेज वेगळंच काही सांगत आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, संजय गुप्ता यांचं निधन 30 ऑक्टोबरच्या रात्री झालं. बाथरुममध्ये घसरुन पडल्याने त्यांचं निधन झालं असं सांगितलं जात आहे. जेव्हा ही गंभीर घटना घडली, तेव्हा ते घरीच होते आणि त्यांची मुलं आणि बायको त्यांच्या खोलीत झोपले होतं. रात्रीच्या वेळी आपल्या घरात काय घडत आहे, हे त्यांना माहितीच नव्हतं. दुसरा दिवस उजाडल्यानंतर संजय यांचं निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली. आता याप्रकरणी पोलीस चौकशी होत आहे.

रिपोर्टनुसार, संजय गुप्ता यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे आहे. पोलिसांनी सर्वात आधी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्यातून वेगळंच चित्र समोर आलं. सीसीटीव्ही फुटेजनुसार, मध्यरात्री 2 च्या सुमारास संजय ड्राइंग रुममध्ये बसले होतं. थोड्या वेळाने उठून ते किचनकडे गेले.

ड्रॉइंग रूममधून किचनकडे जाताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडून भिंतीवर आदळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किचर आणि ड्रॉइगं रुममधील भिंतीच्या कोपऱ्याला संजय यांचं डोकं आदळल्याने त्यांनी गंभीर दुखापत झाली. फुटेजमध्ये त्यांच्याजवळ एक कुत्रा देखील दिसत आहे. संजय गुप्ता यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) दाखल केला आहे. पोलीस आता याप्रकरणी अधीक चौकशी करत आहेत.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language