Hashtagintro

भाजपला आजवरचा सर्वात मोठा झटका… थेट केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांचे पती होणार दीपकेंच्या आंदोलनात सामील

भाजपला आजवरचा सर्वात मोठा झटका… थेट केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांचे पती होणार दीपकेंच्या आंदोलनात सामील

भाजपला आजवरचा सर्वात मोठा झटका बसला आहे. भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर हे अभिजीत दीपके यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहेत. एसआयआर विरोधातील आंदोलनात निर्मला सीतारमण यांचे पती दीपकेंना साथ देणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात सीतारमण यांचे पती पराकला प्रभाकर हे दीपके आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यासोबत एकाच मंचावर दिसणार आहेत.

पीपल अगेन्स्ट एसआयआर या संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती आणि प्रसिद्ध व्यक्तीही सामील होणार आहेत. या कार्यक्रमातून एसआयआर रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं आहे.

निर्मला सीतारमण यांचे पती पराकला प्रभाकर हे बीजेपीचे टीकाकार आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करून भाजपवर हल्ला चढवला आहे. आता प्रत्येक गल्लीत जंतरमंतर. शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 रोजी लोकशाहीच्या स्थापनेसाठी जन आंदोलन. या, या आव्हानाचा सामना करा, असं आवाहन प्रभाकर यांनी पोस्टमधून केलं आहे. या आंदोलनात AISA ची अध्यक्षा नेहा बोरा, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

कोण आहेत प्रभाकर?

पराकला प्रभाकर यांनी यूट्यूबर ध्रुव राठी आणि प्रकाश राज यांच्यासोबत 8 ऑक्टोबर रोजी बंगळुरूच्या फ्रिडम पार्कमध्ये सीजेपीच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला होता. सीतारमण या भाजपमध्ये असूनही प्रभाकर हे सत्ताधारी पक्षावर कठोर टीका करत आले आहेत. सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणारवर प्रभाकर यांनी सातत्याने कठोर टीका केली आहे.

प्रभाकर यांनी द क्रुक्ड टिम्बर ऑफ न्यू इंडिया या त्यांच्या पुस्तकातून नोटबंदीवर जोरदार टीका केली आहे. तसेच देशात बेरोजगारी वाढत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. तसेच मोदी सरकार आल्यापासून लोकशाही संस्था कमकुवत होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रभाकर यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नरसपुरम येथला आहे. त्यांची निर्मला सीतारमण यांच्याशी दिल्लीच्या जेएनयूमध्ये भेट झाली. राजकीय विचारधारा वेगळी असूनही दोघांनी 1986 मध्ये विवाह केला होता. 2009मध्ये प्रभाकर राजकारणात आले. त्यांनी अभिनेता चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम पार्टीत प्रवेश केला होता. 2014 ते 2018 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील आंध्रप्रदेश सरकारमध्ये संचार सल्लागार म्हणून काम केलं होतं.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language