Hashtagintro

भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना कुठे गमावला? न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की…

न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला आणि मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने विजयासाठी 199 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारताने 13.4 षटकात चार गडी गमवून पूर्ण केलं. यात अभिषेक शर्माने 38 चेंडूत 113 धावांची खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने 19 चेंडूत 45 धावा केल्या. या दोघांच्या आक्रमक खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला. तसेच कमबॅक करण्याची संधीच मिळाली नाही. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांना रोखणं कठीण आहे.

काय म्हणाला मिचेल सँटनर?
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, ‘या पद्धतीची फलंदाजी यापूर्वी पाहिली आहे. आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजांचा हा अंदाज पाहिला आहे. आता न्यूझीलंडमध्ये त्याचा सामना करावा लागत आहे. जेव्हा हे फलंदाज लयीत असतात तेव्हा त्यांना रोखणं कठीण असते.’ न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा आमच्या पारड्यात पडला नाही. डॅरेल मिचेल आणि बेबन जेकबने चांगली भागीदारी केली म्हणून 200 धावांच्या आसपास पोहोचलो. सँटनर पुढे म्हणाला की, अशा खेळपट्ट्यांवर 200 ही चांगली धावसंख्या आहे.
https://www.prahaar.in/2026/10/27/ind-vs-nz-3rd-t20-yuvraj-singh-takes-a-playful-dig-after-century-plus-knock-abhishek-sharma-responds-in-a-fun-way/
मिचेल सँटनरने भारतीय गोलंदाजांचं कौतुकही केलं. सँटनर म्हणाला की, शेवटची षटकं त्यांनी चांगली टाकली. यॉर्करचा चांगल्या पद्धतीने वापर केला. त्यामुळे न्यूझीलंडला धावा करणं शेवटच्या षटकात कठीण झालं. दरम्यान, दव पडल्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण होतं, हे सांगण्यासही विसरला नाही. या फॉर्मेटमध्ये पॉवर प्ले हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि भारताने सुरूवातीच्या सहा षटकात सामना खेचून नेला.
मालिका गमवल्यानंतर न्यूझीलंडपुढे आता कमबॅकचं आव्हान आहे. सँटनरने चौथ्या टी20 सामन्यापूर्वी सांगितलं की, टीम इंडियाच्या फलंदाजांविरुद्ध पुन्हा एकदा रणनिती आखावी लागणार आहे. पुढचा सामना वेन्यू ईडन पार्कवर आहे. तिथलं मैदान चारही बाजूने छोटं आहे. त्यामुळे भारताच्या आक्रमक फलंदाजीला रोखणं आव्हानात्मक ठरू शकते.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language