मराठी गाण्याचे बोल, शब्द, संगीत सगळंच सुंदररीत्या गुंफल्यासारखं वाटतं. अशीच काही गाणी मनाच्या अगदी जवळची बनतात. असंच एक गाणं आहे 'केवड्याचं पान तू…'
केवड्याचं पान तू हे गाणं ऐकून मन अगदी शांत होतं. पण एकेकाळी हे गाणं अनेक दिग्दर्शकांनी नाकारलं होतं.
काही कलाकृती खूप सुंदर असतात, मात्र त्यांच्या नशिबी काही वेगळंच लिहिलेलं असतं. असंच काहीसं 'केवड्याचं पान तू…' या गीतासोबत घडलं. कोणीही घेईना तेव्हा बाजूला ठेवण्यात आलेलं हे गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिलं आहे.
याचं संगीत विजय गावंडे यांनी दिलं होतं. अखेर थंड बस्त्यात गेलेलं हे गीत दिग्दर्शक नीतीन सुपेकर यांना पसंत पडलं.
नीतीन सुपेकरांच्या 'सरला एक कोटी' या सिनेमासाठी हे गाणं निवडण्यात आलं अन् या गाण्याने कमाल केली. गीतकार विजय गावंडे म्हणाले, आपली मुलगी अखेर योग्य घरी नांदते.
Source: TV9 Marathi Entertainment





