Hashtagintro

मराठी अभिनेत्रीनं गायलं अन् पवित्र झालं, 46 वर्षांपासून या गाण्याला शाळेत प्रार्थनेचं स्थान, वाटतं ऐकतंच राहावं

मराठी अभिनेत्रीनं गायलं अन् पवित्र झालं, 46 वर्षांपासून या गाण्याला शाळेत प्रार्थनेचं स्थान, वाटतं ऐकतंच राहावं

शाळेमध्ये अनेक प्रार्थना गीतं गायली जातात. ज्यामध्ये अनेकांना फक्त इतनी शक्ती हमे देना दाता आणि ए मालिक तेरे बंदे हम या दोन गाण्यांबद्दल माहिती असते. पण या यादीमध्ये आणखी एक खास गाणं आहे, 46 वर्षांपूर्वी रिलिज झालेले आहे. या गाण्याचे संगीतकार आर डी बर्मन असून या गीताचे गीतकार उर्दू साहित्यातील प्रसिद्ध कवी साहिर लुधियानवी यांनी लिहले आहे. खास बाब म्हणजे या गाण्याला आवाज दिला आहे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही विशेष बाब आहे. कारण पद्मिनी या मराठी अभिनेत्री असून त्यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. या सर्व महान कलाकारांनी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.

या गाण्याचे बोल आहेत. ‘तेरी हैं जमीन, तेरा आसमाँ’. हे गाणे चालत्या ट्रेनमध्ये शूट करण्यात आले होते. हे गाणे आजही देशातील अनेक शाळांमध्ये प्रार्थना गीत म्हणून विद्यार्थी गाताना दिसतात. प्रचंड लोकप्रिय सिनेमा द बर्निंग ट्रेन या सिनेमातील हे गाणं असून या सिनेमामध्ये पद्मिनी कोल्हापुरे, धर्मेंद्र, विशाल देसाई, विनोद खन्ना, जितेंद्र, हेमा मालिनी, परवीन बाबी, नीतू कपूर विनोद मेहरा, डॅनी, नवीन निश्चल, सिमी ग्रेवाल आशा सचदेव यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटाचे दिग्शदर्शन बी आर चोपडा यांचे चिरंजीव रवी चोपडा यांनी केले होते. हा सिनेमा एक अॅक्शन ड्रामा असून सिनेमाचं कथानक एका सुपरस्टारच्या अवतीभोवती फिरतं. पूर्ववैमनस्यातून बदला घेण्यासाठी या ट्रेनमध्ये एक बॉम्ब फिट केला जातो. पण त्यामुळे सर्व प्रवाशांचे जीव धोक्यात येतात. ट्रेन थांबली तर ब्लास्ट होणार, अशी धमकी खलनायकाने दिलेली असते. त्यानंतर अभिनेता धर्मेंद्र आणि इतर कलाकार यासगळ्यातून कसा बचाव काढतात, अशा स्वरूपाची थरारक कथा या सिनेमाची असून सिनेमाही गाजला होता. या सिनेमाचं काही चित्रिकरण वडोदरा स्टेशनवर झाले आहे.

 

गाण्याचे बोल

तेरी है जमीन तेरा आसमान
तू बड़ा मेहरबान तू बक्षीस कर

सभी का है तू सभी तेरे
खुदा मेरे तू बक्षीस कर

तेरी है जमीन तेरा आसमान
तू बड़ा मेहरबान तू बक्षीस कर

सभी का है तू सभी तेरे
खुदा मेरे तू बक्षीस कर

तेरी है जमीन तेरा आसमान
तू बड़ा मेहरबान तू बक्षीस कर

सभी का है तू सभी तेरे
खुदा मेरे तू बक्षीस कर

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language