मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या विधी खात्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात असून महापालिका प्रशासनाने या खात्यांतील पदांमध्ये सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये खात्यांमधील अनावश्यक पदांची साफसफाई करून ती पदे काढून टाकली आहेत. अशाप्रकारे विधी खात्यातील तब्बल ३५ पदे कायमचीच रद्द करण्यात आली आहे. यामध्ये कनिष्ठ कायदा अधिकारीपासून ते फलक परिचर पर्यंतच्या पदांचा समावेश आहे.
मुंबई महापालिकेच्या विधी खाते अर्थात कायदा अधिकारी विभागाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची आकृतीबंध सुधारीत करण्याचा निर्णय घेण्यात आहे. या विधीखात्यामध्ये कायदा अधिकारीपासून वरिष्ठ विधी सहायक, लिपिक आणि हमाल आदींपर्यंतची एकूण ३५५ पदे असून त्यातील त्यातील एकूण ३५ पदे कमी करण्यात येत आहेत, तर २५ पदे नव्याने वाढवण्यात येणार आहे.
यामध्ये विधी खात्याच्या आस्थापनेवरील सहायक कायदा अधिकारी या संवंर्गातील ३२ अन अनुसुचित पदे व सहायक कायदा अधिकारी श्रेणी २ या संवंर्गातील २४ अन अनुसुचित पदे ही अनुसूचीवर घेण्यात येणार आहे. तसेच विधी खात्याच्या आस्थापनेवरील विविध संवंर्गातील एकूण ३५ अनुसुचित पदे ही त्वरीत खंडित येत आहे. खंडित करण्यात येणाऱ्या या पदांमध्ये कनिष्ठ कयदा अधिकारी(०४), प्रमुख चौकशी अधिकारी (०१), चौकशी अधिकारी (०५), वरिष्ठ विधी सहायक ( ०७), अधिक्षक न्यायालय(०२), अधिक्षक हस्तांतरण(०१), वरिष्ठ न्यायालयीन लिपिक (०१), लघुलेक उच्च श्रेणी(०२), लघुलेखक कनिष्ठ श्रेणी(१०), फलक परिचर (०२) आदींचा समावेश आहे.
https://www.prahaar.in/2026/11/10/bmc-name-has-finally-been-entered-onto-property-cards-the-process-of-registering-its-name-on-the-property-cards-for-as-many-as-1890-land-parcels-has-been-completed/
तर २५ अनुसूचित पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. यामध्ये ‘सहायक कायदा अधिकारी’ या संवर्गातील ०७ अनुसूचित पदे, ‘सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)’ ह्या संवर्गातील ०२ अनुसूचित पदे, ‘मुख्य लिपिक’ ह्या संवर्गातील ०१ अनुसूचित पद, ‘कार्यकारी सहायक’ ह्या संवर्गातील १२ अनुसूचित पदे व ‘नाईक’ ह्या संवर्गातील ०२ अनुसूचित पदे, ‘उप कायदा अधिकारी’ ह्या संवर्गाचे ०१ अनुसूचित पद अशी एकूण २५ अनुसूचित पदे नव्याने निर्माण करून आस्थापना अनुसूचीवर घेण्यात येणार आहे प्रस्ताविण्यात येत आहे.
Source: Prahaar News