Hashtagintro

महिलेला समुद्र किनारी सापडली अजब वस्तू, रातोरात बनली करोडपती, तुम्हाला सापडली तर जपून ठेवा

महिलेला समुद्र किनारी सापडली अजब वस्तू, रातोरात बनली करोडपती, तुम्हाला सापडली तर जपून ठेवा

कुणाचं नशीब कधी उघडेल काही सांगता येत नाही. कठोर परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही, असं सांगितलं जातं. पण आयुष्यभर कष्ट करूनही नशिबाची दारे उघडत नसतात. पण कधी कधी काही काम न करता रस्त्याने जाता जाता किंवा अपघातानेच माणूस श्रीमंत होतो. रातोरात नशीब पालटतं. थायलंडच्या महिलेचं नशीबही असंच उघडलं. नाखोन सी थम्मारताच्या तटावर (Coast Of Nakhon Si Thammarat) फिरत असताना या महिलेला वाळूत अशी काही वस्तू सापडली की ती रातोरात करोडपती झाली.

सिरिपोर्न न्यूमरीन असं या 49 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला समुद्र किनारी नेहमीप्रमाणे फिरत होती. वाळूवरून जात असताना तिला अचानक एक अजब गाठ दिसली. तिला त्यात माश्या सारखा वास आला. काही तरी कामाची वस्तू असेल असं तिला वाटलं. ती ही वस्तू घरी घेऊन आली. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना बोलावून ती वस्तू काय आहे हे ओळखण्यास सांगितलं. त्यावेळी एका व्यक्तीने ती वस्तू निरखून पाहिली. आणि ही व्हेल माश्याची उलटी असल्याचं सांगितलं. याला एम्बरग्रीसही म्हटलं जातं. व्हेल माश्याची उलटी असल्याचं कळल्यावर तिचं नशीबच बदलून गेलं.

किंमत 1.8 कोटी रुपये

ही व्हेलची उलटी आहे, असं शेजाऱ्याने सांगताच तिला आश्चर्य वाटलं. व्हेल माश्याची उलटी आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यंत महागडी विकल्या जात असल्याचं तिला नंतर कळलं. तिला 12 इंच रुंद आणि 24 इंज लांब व्हेल माश्याची उलटी सापडली. या उलटीची मार्केटमध्ये किंमत सुमारे 1.86 लाख पाउंड म्हणजे सुमारे 1.8 कोटी रुपये आहे.

व्हेल माश्याची उलटी किंवा एम्बरग्रीसचं उत्पादन शुक्राणू व्हेलच्या प्रणालीत होतं. त्याचा उपयोग उंची परफ्यूम बनवण्यासाठी होतो. हे परफ्यूम बाजारात अत्यंत महागडे विकले जातात. या उलटीचा सुगंध दीर्घकाळपर्यंत राहतो.

अशी ओळखा उलटी

जर तुम्हाला व्हेल माश्याची उलटी मिळाली तर ती सोप्या पद्धतीने ओळखता येईल. या उलटीचा थोडासा भाग आगीच्या ज्वाळेवर ठेवा. हा भाग पिघळल्यानंतर परत एकजीव होऊन टणक झाला तर ही व्हेल माश्याची उलटी असल्याचं समजून जा. न्यूमरीननेही हा प्रयोग करून पाहिला होता. त्यानंतर तिला ही व्हेल माश्याचीच उलटी असल्याची खात्री पटली.

मी लकी, चांगली किंमत मिळेल

संशोधकांनी घरी येऊन या माश्याच्या उलटीची योग्य तपासणी करण्याची ती वाट पाहत आहे. व्हेलची उलटी सापडल्यानंतर न्यूमरीनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मी खूप लक्की आहे. भाग्यशाली आहे. मला व्हेल माश्याच्या उलटीचा एवढा मोठा तुकडा सापडला. आता मला याची चांगली किंमत मिळेल याची आशा आहे. सध्या तरी मी त्याला माझ्या घरात सुरक्षित ठेवलं आहे, असं तिने म्हटलंय.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language