न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडला टी20 मालिकेत 3-2 ने पराभूत केलं. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात वैभव सूर्यवंशीला जागा मिळाली नाही. इशान किशन दुखापतीतून सावरल्यानंतर वैभव सूर्यवंशीला शेवटच्या दोन्ही टी20 सामन्यात जागा मिळाली नाही. त्यामुळे टीकाकारांनी प्रशिक्षक गौतम गंभीरवर भलतेसलते आरोप करण्यास सुरूवात केली. मालिका जिंकल्यानंतरही युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला संधी न दिल्याने आगपाखड केली. त्या उलट या मालिकेत फेल गेलेल्या संजू सॅमसनला वारंवार संधी दिली गेली. पाचव्या टी20 मालिकेतील प्लेइंग 11 नंतर गौतम गंभीरने यावर भाष्य केलं. गौतम गंभीरने ब्रॉककास्टरशी बोलताना आपलं म्हणणं मांडलं.
काय म्हणाला प्रशिक्षक गौतम गंभीर?
पाचवा टी20 सामन्यापूर्वी ब्रॉडकास्टरने प्लेइंग 11 निवडीवरून गौतम गंभीरला प्रश्न विचारला. गौतम गंभीर म्हणाला की, संघ निवडीच्या निर्णयांबाबत माझी जबाबदारी सर्वात आधी, सर्वांना खूश करणे हे माझे काम नाही. माझे काम योग्य निर्णय घेणे आहे, लोकप्रिय निर्णय घेणे नाही. त्यासाठीच मी इथे आहे. गौतम गंभीर पुढे म्हणाला की, बाहेरील मतांपेक्षा संघाच्या प्राधान्यक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. लोकप्रिय निर्णय घेणे सोपे आहे. पण माझ्यासाठी, योग्य निर्णय घेणे आणि ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही व्यवस्थित आहे याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
https://www.prahaar.in/2026/11/01/ind-vs-nz-t20-what-went-wrong-in-the-last-two-matches-against-new-zealand-captain-shreyas-iyer-points-out-the-errors/
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, भारतीय संघात एकापेक्षा एक वरचढ खेळाडू आहे. जे खेळाडू दीर्घ काळापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत, त्यांना संघात अधिक संधी दिली पाहीजे. त्यासाठी त्यांना प्राधान्य देणं भाग आहे. इशान किशन जखमी झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीला मालिकेत संधी दिली गेली. त्याने दोन सामने खेळले. पण इशान किशन परतल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारताने विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली. पण शेवटच्या दोन सामन्यात भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. खासकरून फलंदाजीत भारतीय संघाने नांगी टाकल्याचं दिसून आलं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असायला हवा होता, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
Source: Prahaar News
