Hashtagintro

मी नाकाची सर्जरी केल्यानंतर… श्रीदेवीची काय होती पहिली प्रतिक्रिया? जान्हवी कपूरचा पहिल्यांदाच मोठा खुलासा

मी नाकाची सर्जरी केल्यानंतर… श्रीदेवीची काय होती पहिली प्रतिक्रिया? जान्हवी कपूरचा पहिल्यांदाच मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने एक अनोखा किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा तिच्या आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी तिच्या आई दोघींमधील आहे. तिने सांगितलं की ‘मी मम्मीला मला सिनेक्षेत्रात करिअर करण्याबद्दल म्हणजे अभिनेत्री बनण्याबद्दल सांगितलं होतं. पण तेव्हा तिला माझ्यावर विश्वास नव्हता. ती त्यासाठी तयार असल्याचं तिच्या रिअॅक्शनवरुन वाटलं नव्हतं, असा मोठा खुलासा जान्हवीने केला आहे. पण जेव्हा जान्हवीने तिच्या नाकाची सर्जरी करुन घेतली त्यानंतर मात्र श्रीदेवी यांचं मत पूर्णपणे बदललं आणि त्यांनी तयारीही दर्शवली असल्याचं जान्हवी म्हणाली आहे.

नेमकं काय म्हणाली जान्हवी?

जान्हवी कपूर ही एका पॉडकास्टमध्ये बोलत होती. तेव्हा तिने ही मोठी माहिती शेअर केली आहे. जान्हवीची सर्जरी झाल्यानंतर श्रीदेवी म्हणालेल्या की आता तू कदाचित अभिनेत्री बनू शकतेस, असा किस्सा तिने सांगितला. जान्हवी म्हणाली की, मम्मीने मला यासाठी सपोर्ट केला नाही, असं नाही. तिने मला प्रचंड सपोर्ट केला, त्याचवेळी तिने यासाठी काय काय करावं लागेल, संपूर्ण जीवनाचा विचार करावा लागेल, असंही सांगितलं. जान्हवीने नाकाच्या सर्जरीचा किस्सा हा मिश्किलपणे सांगितला.

दरम्यान, जान्हवीच्या आधीच्या लूकवरुन श्रीदेवी पूर्णपणे अभिनय क्षेत्रातील करिअरबद्दल निर्धास्त नव्हत्या पण जेव्हा नाकाची सर्जरी झाली आणि लूकमध्ये मोठा सकारात्मक बदल दिसून आला त्यानंतर श्रीदेवी या आनंदी झाल्या आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिला अशी माहिती जान्हवीने शेअर केली आहे.

जान्हवी गाजवतेय साऊथ-बॉलिवूड सिनेमे

जान्हवीने श्रीदेवी यांच्या निधनानंतर २०१८ साली प्रदर्शित झालेल्या धडक या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. त्यानंतर तिने अनेक सिनेमांममध्ये काम केलं, ज्यामध्ये साऊथ सिनेमांचाही समावेश आहे. धडक सिनेमामध्ये तिच्यासोबत इशान खट्टरही झळकला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. मराठीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सैराट या सिनेमाचा तो हिंदी रिमेक होता. या सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली होती.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language