Hashtagintro

मुंबईत शिवशस्त्र शौर्यगाथेचा ऐतिहासिक ठेवा! वाघनखे, तलवारी पाहण्याची संधी; पुढील 6 महिने प्रदर्शन खुले

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी, संग्रहालयाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. शिवकालीन इतिहासाचा अनमोल ठेवा नागरिकांसमोर आणण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे हे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून आणि आवश्यक नियमांचे पालन करून हा ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत आणण्यात आला आहे. या वाघनखांच्या माध्यमातून शिवरायांच्या शौर्याची आणि रणनीतीची माहिती नागरिकांना अनुभवता येणार आहे. सेनासाहेब सुभा रघुजीराजे भोसले यांची तलवार, सरसेनापती प्रतापराव गुजर यांची तलवार, खंडेराव गायकवाड यांची ढाल आणि सरदार रास्ते यांचा दांडपट्टा यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. शिवकालीन आणि समकालीन शस्त्रपरंपरेचा अभ्यास करण्याची संधी यामुळे मिळणार आहे. ऐतिहासिक शस्त्रे ही केवळ पराक्रमाची प्रतीके नसून धैर्य, अभियांत्रिकी कौशल्य आणि धातुशास्त्राचा वारसा असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ हे प्रदर्शन पुढील सहा महिने सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. यापूर्वी सातारा, कोल्हापूर आणि नागपूर येथे या प्रदर्शनाला लाखो नागरिकांनी भेट दिली आहे. आता मुंबईतील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटकांनाही शिवकालीन शस्त्रांचा ऐतिहासिक वारसा जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language