Hashtagintro

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; सुरत-बिलीमोरा मार्गावर वीज यंत्रणा सुरू

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडलं आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरच्या सुरत-बिलीमोरा विभागात ओव्हरहेड उपकरण (OHE) प्रणाली २० नोव्हेंबर २०२६ रोजी यशस्वीपणे सुरू करण्यात आली. यामुळे बुलेट ट्रेनच्या चाचणीकडे वाटचाल आणखी वेगवान झाली आहे.सुरक्षा आणि ठरलेल्या नियमांचं पालन करण्यासाठी तांत्रिक पथकांच्या कडक देखरेखीखाली ही वीज यंत्रणा टप्प्याटप्प्याने छोट्या-छोट्या विभागांमध्ये सुरू केली जाणार आहे.या विभागात उन्नत (एलिव्हेटेड) रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही लाईन्सचा समावेश आहे. ओव्हरहेड वीज यंत्रणा सुरू होणं हे प्रकल्पातील आगामी चाचणी उपक्रमांसाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरमध्ये अत्याधुनिक 2 x 25 केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणाली बसवण्यात आली आहे. जगभरातील हाय स्पीड रेल्वे प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वात आधुनिक विद्युतीकरण तंत्रज्ञानापैकी हे एक आहे. ५०८ किमीचा कॉरिडॉर, १४ सब-स्टेशन ५०८ किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमध्ये एकूण १४ महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) उभारण्यात आले आहेत. हे सब-स्टेशन राष्ट्रीय वीज ग्रीडमधून वीज घेऊन हाय स्पीड ट्रेनच्या ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणालीला वीजपुरवठा करणार आहेत.गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात असलेल्या बिलीमोरा येथील पहिल्या ट्रॅक्शन सब-स्टेशनमध्ये कंट्रोल पॅनल, चेंजओव्हर स्विच, ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट ब्रेकर बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे.गुजरातमधील या सब-स्टेशनला गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (GETCO) च्या २२० केव्ही अंबेठा ग्रीड सब-स्टेशनमधून वीजपुरवठा मिळणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/21/not-a-single-local-terrorist-is-active-in-the-kashmir-valley-union-home-minister-amit-shah-makes-a-major-claim/
केंद्रीय नियंत्रण कक्षातून देखरेखसंपूर्ण वीज नेटवर्कवर एका केंद्रीकृत नियंत्रण केंद्राच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कुठेही बिघाड झाला तर लगेच त्याची माहिती मिळून दुरुस्ती करता येईल. या यशस्वी ऊर्जीकरणामुळे आता या मार्गावर ट्रॅक, सिग्नल आणि इतर यंत्रणांच्या चाचण्या घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरत-बिलीमोरा विभाग हा गुजरातमधील महत्त्वाचा टप्पा असून, येत्या काळात येथे बुलेट ट्रेनची चाचणी धावण्याची शक्यता आहे.भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचं स्वप्न आता हळूहळू प्रत्यक्षात येत असून, या प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language