Hashtagintro

मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सकाळी उठल्यावर पालकांनी आवर्जून कराव्यात ‘या’ गोष्टी; आयुष्यात दिसेल सकारात्मक बदल

मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सकाळी उठल्यावर पालकांनी आवर्जून कराव्यात ‘या’ गोष्टी; आयुष्यात दिसेल सकारात्मक बदल

प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याची बुद्धिमत्ता वाढावी आणि त्याने नेहमी आनंदी राहावे. मुलांच्या मेंदूच्या विकासात त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा आणि पालकांच्या वागणुकीचा महत्त्वाचा वाटा असतो. अनेकदा नकळत पालकांकडून अशा काही चुका होतात, ज्याचा मुलांच्या मनावर आणि वागण्यावर परिणाम होऊ शकतो.

उदाहरणार्थ, मूल सकाळी रडत उठल्यास त्याला रागावण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगणे अधिक योग्य ठरते. कारण दिवसाची सुरुवात ज्या वातावरणात होते, त्याचा परिणाम मुलांच्या मूडवर आणि दिवसभराच्या वागण्यावर होऊ शकतो. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी सकाळची पहिली १० मिनिटे महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे या वेळेत पालकांनी मुलांसोबत नेमके काय करावे, जाणून घेऊया.

बाळाला किस करा आणि मिठी मारा

सकाळची पहिली १० मिनिटे मुलांसाठी खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात प्रेमळ शब्दांनी करा. मुलाला उठवताना ‘गुड मॉर्निंग सनशाइन’, ‘आजचा दिवस तुझ्यासाठी खास असणार आहे’, ‘तू खूप हुशार आणि मनाने चांगला आहेस’ असे सकारात्मक शब्द बोला. त्यानंतर मुलाला प्रेमाने मिठी मारा आणि किस करा. पालकांचा हा प्रेमळ स्पर्श मुलाला सुरक्षिततेची आणि आपलेपणाची भावना देतो. त्यामुळे त्याचा मूड चांगला राहण्यास आणि दिवसाची सुरुवात आनंदाने करण्यास मदत होते.

जग साहस आणि उत्साहाने भरलेले आहे हे सांगा

मुलाला सकाळी उठल्यावर आजचा दिवस काहीतरी नवीन शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी आहे, असे सांगा. हे जग अनेक सुंदर गोष्टी आणि मजेदार अनुभवांनी भरलेले आहे, याची त्याला जाणीव करून द्या. आजचा दिवस मजेदार बनवण्यासाठी त्याला काय करायला आवडेल, असे विचारा. मित्रांसोबत खेळणे, शाळेत काहीतरी नवीन शिकणे किंवा आवडीचा नाश्ता करणे अशा गोष्टींबद्दल त्याच्याशी बोला. यामुळे मुलाला स्वतःच्या आवडीनिवडी व्यक्त करण्याची संधी मिळते आणि दिवसाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागते.

मुलाला त्याचे महत्त्व आणि चांगले गुण सांगा

सकाळी उठल्यावर मुलाला तो तुमच्यासाठी किती खास आहे, हे आवर्जून सांगा. त्याच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करा आणि त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे, हे व्यक्त करा. ‘तू खूप छान प्रयत्न करतोस’, ‘तू नवीन गोष्टी नक्की शिकू शकतोस’ किंवा ‘मला तुझा अभिमान वाटतो’ असे शब्द मुलाला प्रोत्साहन देतात. पालकांचे प्रेम आणि विश्वास यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच, नवीन गोष्टी शिकताना किंवा अडचणींचा सामना करताना तो अधिक धैर्याने प्रयत्न करू शकतो.

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language