Hashtagintro

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? गुलाबराव पाटलांनी उडवली खळबळ

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? गुलाबराव पाटलांनी उडवली खळबळ

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची चर्चाही सुरू झाली आहे. शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी काल अचानक ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. त्यात आता शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली नाही. उलट जिकडे एकनाथ शिंदे जातील, तिकडे आम्ही जाणार, असं सूचक विधान करून गुलाबराव पाटील यांनीही या चर्चेला हवा दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता फेटाळली नाही. उलट सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का? असा सवाल गुलाबराव पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेटच भाष्य केलं. मी काही सांगू शकत नाही. शेवटी मी आगगाडीचा डब्बा आहे. आमचे एकनाथ शिंदे इंजिन आहेत आणि इंजिन जिथे असतं तिथे डब्बा असतो. त्यामुळे जिकडे आमचे इंजिन जाईल, तिकडे डब्बा जाईल, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

मी राष्ट्रवादीचा नाही

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणाबरोबर एकत्र यावं किंवा येऊ नये हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. शरद पवार देशाचे नेते आहेत आणि त्यांच्या आजारपणाचं कारण असल्यामुळे त्या भेटायला जाऊ शकतात. अशी बरीच कारणं आहेत. विलीनीकरणाच ही सुरू असेल. मात्र मी राष्ट्रवादीचा नेता नाही. त्यामुळे मला त्याबाबत माहिती नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

हवामान फेल सांगणारा…

राष्ट्रवादीचे 20-30 आमदार पक्ष सोडणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यावरही त्यांनी भाष्य केलं. संजय राऊत यांनी केलेले किती दावे खरे झाले याची टक्केवारी काढली तर ती शून्य आहे. दावा करणं ठिक आहे. मात्र दावा किती खरा झाला ते देखील बघितलं पाहिजे. सगळ्या गोष्टींवर संजय राऊत भविष्यकारासारखे बोलत असतात. त्यांची कोणतीही भविष्यवाणी सत्य होत नाही. हवामान फेल असलेला, हवामानाचा चुकीचा अंदाज सांगणारा तो फेल शास्त्रज्ञ आहे, म्हणून पाऊस पडत नाही, असा चिमटा त्यांनी राऊत यांना काढला.

विरोधक बोलत असतात, त्यांनी…

गोकुळच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं. कोरमच पूर्ण होत नसेल तर काही गोष्टींचा नाईलाज असतो. शेवटी संस्था चालवणे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला. त्यावर टीका करणं हे विरोधकांचं काम आहे. ते नेहमी बोलत असतात. त्यांनी बोललंच पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language