Hashtagintro

मोठ्या राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

मोठ्या राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

दिल्लीत आज घडामोडींना वेग आला. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला असून शिंदे गटाचे वकील युक्तीवाद करत आहेत. या सुनावणीकडे राज्याच्या नजरा आहेत. शिवसेना ठाकरे गटाने कोर्टात मागणी केली की, जर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला देणे शक्य नसेल तर ते चिन्ह गोठवावे. याला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून ही सुनावणी सुरू आहे. कोर्ट आपला निकाल लवकरच देईल. या प्रक्रियेत निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यापूर्वीच राज्यात घडामोडींना वेग आला. काही महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे एकून 6 खासदार फोडले. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिदेंच्या शिवसेनेत 6 खासदारांनी प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का होता.

या खासदारांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात 45 मिनिटे महत्त्वपूर्ण बैठक झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्वप्राप्त झाले.

मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, योगेश कदम यांच्याकडून मोठे विधाने काही दिवसांपासून केली जात आहेत.  एनडीएतील संभाव्य राजकीय समीकरणांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज आहे. खासदारांनंतर काही आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याची तूफान चर्चा ही रंगताना दिसली.

सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यापैकी 2 खासदारांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अजून रखडला आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. ठाकरे गटातून आलेल्या या खासदारांच्या गळ्यात थेट मंत्रिपदाची माळ पडणार आहे.

 

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language