Hashtagintro

यापूर्वी सीमेवर… एस जयशंकर यांचे चीनच्या सीमेबद्दल मोठे विधान, थेट गलवान..

यापूर्वी सीमेवर… एस जयशंकर यांचे चीनच्या सीमेबद्दल मोठे विधान, थेट गलवान..

गलवान घाटीत भारत आणि चीनमध्ये हिंसक झडप झाली. ज्याचे काही खळबळजनक व्हिडीओ पुढे आले. भारत आणि चीनचे सैनिक भिडले होते. यात काही भारतीय सैनिकांना वीरमरण आले. चीनच्या सैनिकांनी दादागिरी बघायला मिळाली. गलवान हिंसेनंतर चीन सीमेवरील परिस्थिती सतत बदलत आहे. भारताने चीनची वाढती ताकद बघता लष्करी ताकद आणि सज्जता अधिक वाढवली. मागच्या काही वर्षांचा विचार केला असता भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारली आहेत. मात्र, चीन सीमेवर भारतावर दबाव टाकण्यासाठी कायमच प्रयत्न करतो. याबाबत आता स्पष्ट बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर दिसले आहेत. चीन सीमेजवळ भारताकडून पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत. त्यांनी हेही स्पष्ट केले की, सीमेवरील कोणतीही परिस्थिती हाताळण्याची आणि दीर्घकाळापर्यंत आपल्या सैन्याची तैनाती कायम ठेवण्याची भारताची क्षमता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या सीमेच्या सुविधांकडे दुर्लक्ष अनेक वर्ष झाल्याचेही एस. जयशंकर यांनी म्हटले. एस. जयशंकर यांनी म्हटले की, त्या सीमेवर आपली ताकद वाढवण्यात आली. मी तर म्हणेल की, अत्यंत महत्वपूर्ण सुधारणा तिथे झाल्या आहेत. अगोदरसारखी तिथे स्थिती नाहीये. तिथे आता सुधारणा मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. जून 2020 मध्ये गलवान घाटीत मोठी हिंसा झाली होती.

भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते. या झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशात तणाव प्रचंड वाढला होता. जयशंकर यांनी म्हटले की, या सीमेवर भारताची ताकद वाढवणे आवश्यक होते. या प्रदेशातील पायाभूत सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नव्हते.

एस. जयशंकर यांनी पुढे म्हटले की, एका दशकापूर्वीपर्यंत भारताने आपल्या सीमावर्ती भागांतील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले नव्हते. 1980 च्या दशकाचे उदाहरण देताना त्यांनी नमूद केले की, त्या काळात भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थांचे आकारमान साधारणपणे सारखेच होते. चीनने सीमा भागात मोठ्या प्रमाणात काम केले. ते भारताने केले नाही, चीनने याचाच फायदा उचलला.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language