पी. व्ही. सिंधू पती वेंकट दत्ता यांच्यासोबत बंगळुरूमधील एका सुंदर डुप्लेक्स घरात राहते. फराह खानने या घराला भेट दिली तेव्हा सिंधू आणि तिच्या पतीने तिचे स्वागत केले. घरात प्रवेश करताच प्रशस्त आणि सुंदर सजवलेला कॉरिडॉर पाहायला मिळतो.
घरातील कॉरिडॉरमध्ये सुंदर चित्रे, इनडोअर प्लांट्स आणि आकर्षक सजावटीच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. भिंतीवरील फोटो गॅलरीमध्ये सिंधूच्या बॅडमिंटन कारकिर्दीतील महत्त्वाचे क्षण पाहायला मिळतात. यामध्ये तिच्या लग्नाचे फोटोदेखील आहेत.
घरातील लिव्हिंग रूम प्रशस्त असून आधुनिक पद्धतीने सजवण्यात आली आहे. येथे टरक्वॉइज ब्लू सोफा, ग्लास सेंटर टेबल आणि मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत. या भागातून स्विमिंग पूल परिसराचीही सुंदर झलक पाहायला मिळते.
सिंधूच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे महाभारत थीमवर आधारित चेस बोर्ड. काच आणि संगमरवरापासून तयार केलेल्या या बोर्डवर पांडव आणि कौरवांच्या प्रतिकृती आहेत. महाभारतातील प्रसंग दाखवणाऱ्या या अनोख्या चेस बोर्डने फराह खानचेही लक्ष वेधले.
पी. व्ही. सिंधूने 22 डिसेंबर 2024 रोजी उदयपूर येथे वेंकट दत्ता साई यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर दोघांनी बंगळुरूमध्ये आपला संसार थाटला. दोघेही प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात, मात्र घराची झलक पाहून चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.
Source: TV9 Marathi Sports





