Hashtagintro

या टेलिकॉम कंपनीची ग्राहकांसाठी Buy 1 Get 1 Free ऑफर, रिचार्ज 28 दिवसांचं अन् लाभ 56 दिवसांचा, सर्वात स्वस्त प्लॅन

या टेलिकॉम कंपनीची ग्राहकांसाठी Buy 1 Get 1 Free ऑफर, रिचार्ज 28 दिवसांचं अन् लाभ 56 दिवसांचा, सर्वात स्वस्त प्लॅन

सध्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा पहायला मिळत आहे, आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक कसे आकर्षित होतील यासाठी टेलिकॉम क्षेत्रातील विविध कंपन्या आपल्या ग्राहकांना रिचार्जच्या आकर्षक ऑफर देत आहेत. या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागल्याचं पहायला मिळत आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी तीन वर्षांचा एक नवा रिचार्ज प्लॅन तयार केला आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना फक्त दहा हजारांच्या वन टाईम रिचार्जमध्ये तब्बल तीन वर्ष अनलिमिडेट कॉलिंग सुविधा, 2.5 जीबी पर डे डेटा आणि 100 एसएमएस पर डेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, सोबतच जिओ हॉटस्टार सारख्या सुविधा देखील अगदी मोफत मिळणार आहे. दरम्यान जिओने आपल्या नव्या रिचार्जची घोषणा करताच आता एअरटेलने (Airtel) देखील आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफरची घोषणा केली आहे.

एअरटेल आपल्या काही निवडक ग्राहकांना Buy 1 Get 1 Free रिचार्जची ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही जर 349 किंवा 399 चं रिचार्ज केलं तर तुम्हाला तेवढ्याच किंमतीचं एक रिचार्ज संपूर्ण महिनाभरासाठी अगदी मोफत मिळणार आहे. याचाच अर्थ तुम्ही फक्त 28 दिवसांसाठी 349 रुपयांचं रिचार्ज करणार आहात, मात्र तुम्हाला लाभ मात्र प्रत्यक्षात 56 दिवस मिळणार आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की एअरटेलची ही ऑफर काही सर्वच ग्राहकांसाठी लागू नसणार आहे. ही ऑफर एअरटेलच्या काही निवडक ग्राहकांनाच देण्यात आली आहे. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी ही ऑफर तुमच्या नंबरला लागू आहे की नाही? हे एकदा चेक करणं गरजेचं आहे.

एअरटेलच्या 349 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 2GB हाय स्पीड 4G डेटा, ज्यांचा मोबाईल 5G असेल त्यांना 5G डेटा, सोबतच अनलिमेडट कॉलिंग सुविधा आणि पर डे 100 एसएमएसची सुविधा मिळते, समजा जर एअरटेलची बाय वन गेट वन ऑफर तुमच्या सीमसाठी लागू असेल तर तुम्हाला 349 रुपयांच्या रिचार्जमध्ये 56 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा, पर डे 2GB हाय स्पीड डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळते.

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language