Hashtagintro

या देशात भाड्याने मिळते बायको, जर ती आवडली तर… अजबच प्रकार

या देशात भाड्याने मिळते बायको, जर ती आवडली तर… अजबच प्रकार

भारतासारख्या संस्कृती आणि संस्कारांनी समृद्ध असलेल्या देशात पत्नी भाड्याने घेण्यासारखा प्रकार ऐकायला विचित्र वाटतो. परंतु थायलंडमध्ये हे दीर्घकाळापासून सुरू आहे. दक्षिण-पूर्व आशियातील हे सुंदर बेट देश आपल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते, त्यामुळे पर्यटन हा येथील उत्पन्न आणि उपजीविकेचा मोठा आधार आहे. याच कारणामुळे थायलंडच्या पटाया शहरात ‘रेंटल वाईफ’ची (भाड्याची पत्नी) परंपरा विकसित झाली.

येथे पुरुष तात्पुरती जोडीदार म्हणून एखाद्या महिलेला भाड्याने ठेवू शकतात, ज्याला ‘वाईफ ऑन हायर’ किंवा ‘ब्लॅक पर्ल’ म्हटले जाते. ही सुविधा विशेषतः अशा पर्यटकांसाठी असते जे एकटे प्रवास करतात आणि आपल्या वास्तव्यादरम्यान सोबतीची (companionship) इच्छा बाळगतात.

तात्पुरता विवाह

थायलंडमध्ये हा एक प्रकारचा तात्पुरता विवाह मानला जातो, ज्यामध्ये एखाद्या तरुणीला पैसे देऊन काही काळासाठी पत्नीच्या रूपात ठेवले जाते. ठरलेल्या कालावधीपर्यंत ती जोडीदाराप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. हळूहळू या परंपरेने एका संघटित व्यवसायाचे रूप धारण केले आहे. याला ‘रेंटल वाईफ’ म्हटले जाते, जिथे महिला पर्यटकांसोबत काही तासांपासून ते अनेक दिवसांपर्यंत करारावर राहतात.

पुस्तकात उल्लेख

लावर्टे ए इमॅन्युएल यांच्या ‘थाई टॅबू: द राईज ऑफ वाईफ रेंटल इन मॉडर्न सोसायटी’ (Thai Taboo: The Rise of Wife Rental in Modern Society) या पुस्तकाने या वादग्रस्त प्रथेला आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनवले आहे. लेखकाने आपल्या पुस्तकात सांगितले आहे की, थायलंडमध्ये पत्नी भाड्याने ठेवण्याची ही प्रथा कशी वेगाने वाढत आहे आणि हळूहळू एका सामाजिक ट्रेंडसोबतच उत्पन्नाचे मोठे साधन बनत चालली आहे. पुस्तकात हे देखील नमूद केले आहे की, ही व्यवस्था प्रेम, व्यवसाय आणि वाद या तिन्ही गोष्टींचे मिश्रण आहे, ज्याने थाई समाज आणि पर्यटन संस्कृतीवर खोलवर परिणाम केला आहे.

पर्यटनाशी संबंधित बातम्यांनुसार, थायलंडमध्ये मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येतात, ज्यामुळे ‘रेंटल वाईफ’चा ट्रेंड वेगाने वाढला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील अनेक मुली पैशांच्या गरजेपोटी पर्यटकांच्या तात्पुरत्या पत्नी बनतात. हा प्रकार विशेषतः पटायामधील रेड लाईट एरिया, बार आणि नाईट क्लबमध्ये फोफावत असून त्याने आता एका व्यवसायाचे रूप घेतले आहे.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language