
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनवर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, साठपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. रशियाकडून शनिवारी युक्रेनची राजधानी कीववर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांचं निवासस्थान देखील कीवमध्येच आहे. रशियाकडून झेलेंस्की यांचं निवासस्थान असलेल्या शहरालाच आता निशाणा बनवण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. रशियाकडून कीववर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या हल्ल्यामध्ये युक्रेनची प्रचंड जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. या हल्ल्यामध्ये एका सात वर्षांच्या मुलाचा आणि एका वीस वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच साठ नागरिक जखमी झाले आहेत, जखमींमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. या मिसाईल हल्ल्यांमध्ये 25 पेक्षा अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. ज्यामध्ये हॉस्पिटल, शाळा आणि काही रहिवासी इमारतींचा देखील समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान युक्रेनकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. रशिया जाणून बुजून आपल्या नागरी भागांना निशाणा बनवत असल्याचं युक्रेनच्या राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.रशियाने केलेल्या या मिसाईल हल्ल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. रशियाने मुद्दाम आमच्या नागरी वस्त्यांमध्ये हल्ला केला आहे. या ठिकाणी आमचं कोणतंही सैन्यतळ नव्हतं. या हल्ल्यामध्ये आमचं प्रचंड नुकसान झालं आहे, असंही यावेळी झेलेंस्की यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार रशियाकडून युक्रेनेच्या एका रेल्वे स्थानकावर देखील हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा जगाकडे मदतीची मागणी केली आहे. अशा परिस्थितीमध्ये जगाने शांत बसू नये, असं झेलस्की यांनी म्हटलं आहे.
Source: TV9 Marathi International
