Hashtagintro

राजकारणात मोठा उलटफेर! एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली; 5 बाहुबली नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री

राजकारणात मोठा उलटफेर! एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली; 5 बाहुबली नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री

अकोल्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. अकोला जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत मोठे इनकमिंग झाल्याने शिंदे सेनेची ताकद वाढल्याची चर्चा आहे. मूर्तिजापूर नगरपरिषदेतील पाच अपक्ष नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे अकोल्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झालाय. या नेत्यांचा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. या पक्ष प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

कोणी केला शिंदे गटात प्रवेश?

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये संदीप दौलतराव सरनाईक, सारिता काळे पाटील, पूनम रवी मोडक, ममता कैलास महाजन आणि शुभांगी संदीप सरनाईक यांचा समावेश आहे. या पाचही नगरसेवकांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सहकारी ॲड. निलेश देशमुख यांची अकोल्यात भेट घेतली होती. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच अकोल्यातील शिवा मोहोड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोहोड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, महानंदचे संचालक, अकोला जिल्हा दूध संघाचे संचालक, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि अकोला महापालिकेचे माजी बांधकाम सभापती राहिले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश 

या सर्वांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून शिवबंधन बांधले आहे. मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नगरपालिकेत पक्षाचे बळ वाढलं आहे. पुढील काही दिवसांत अकोला जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी होत जिल्ह्यातील बडे चेहरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. पाच नगरसेवकांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर मूर्तिजापूर नगरपालिकेतील पक्षीय बलाबल बदलले आहे. मूर्तिजापूर एकूण जागा  25 जाग आहेत. मूर्तीजापूर नगरपरिषदेत भाजपचे 11 नगरसेवक आहेत. शिंदेसेनेचे 07 नगरसेवक आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे 05 नगरसेवक आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 02 नगरसेवक आहेत. त्यामुळे आता इतर पक्षाचे नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार का, याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language