Hashtagintro

राष्ट्रपती भवनावर हल्ल्याचा प्रयत्न, जगात मोठी खळबळ, थेट मिसाईलने यमनच्या..

राष्ट्रपती भवनावर हल्ल्याचा प्रयत्न, जगात मोठी खळबळ, थेट मिसाईलने यमनच्या..

येमेनच्या हुथी बंडखोरांकडून मोठे हल्ले केले जात आहेत. तणाव हा अधिक वाढत आहे. थेट विमानतळे टार्गेट करून हल्ले होत आहेत. तेल प्रकल्पांवरही हल्ले करण्यात आली. येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारचे लष्करी प्रवक्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुथी बंडखोरांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून दक्षिण शहरातील एडन विमानतळ आणि अलमाशिक अध्यक्षीय राजवाडा, राष्ट्रपती भवनाला टार्गेट केले. सौदी अरेबिया आणि येमेनच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला की, हुथी बंडखोरांनी थेट सौदी अरेबियातील मदिना शहराच्या दिशेनेही एक ड्रोन पाठवला होता. मदिना हे शहर अत्यंत धार्मिक मानले जाते. धार्मिक शहराकडेही ड्रोन पाठवल्याने चांगलीच मोठी खळबळ उडाली. वाद वाढताना दिसत आहे.

इराणवरील हल्ल्यांनंतर हुथी बंडखोर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. एडेनमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जीवितहानी किंवा दुसरे काही नुकसान झाल्याची माहिती मिळत नाही. क्षेपणास्त्र त्यांच्या टार्गेटपर्यंत पोहोचली की नाही याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन मोठे स्फोट झाल्याची माहिती मिळतंय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोन स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक रुग्णवाहिका राष्ट्राध्यक्ष भवनाच्या संकुलाकडे जाताना पाहिली. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वी शहरात त्यांना दोन मोठे स्फोट झाली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानाबद्दल माहिती देण्यात आली नाही.

हुथींकडून थेट राष्ट्रपती भवनाला टार्गेट केले जात आहे. स्थिती गंभीर आहे. याचा परिणाम थेट विमानसेवेवरही होताना दिसत आहे. एडेनवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने असा दावा केला की, त्यांनी मदिना परिसराच्या वर एक ड्रोन नष्ट केले.

सौदी आणि येमेनी अधिकाऱ्यांच्या आरोपानुसार, हे ड्रोन हुथी बंडखोरांनी पाठवले होते. मदिना येथे प्रेषित मुहम्मद यांची मशीद मस्जिद ए नबवी स्थित आहे. इस्लाममध्ये या स्थळाला अत्यंत पवित्र मानले जाते. मक्का परिसरातही एक ड्रोन रोखून नष्ट केल्याचा दावा करण्यात आला. यामुळे स्थिती पुढील काही दिवसात अधिक गंभीर होऊ शकते.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language