Hashtagintro

रोहित पवार हेच तर सूत्रधार नाहीत ना?, त्यांचीच चौकशी करा, आमदार देवयानी फरांदे यांची मागणी

रोहित पवार हेच तर सूत्रधार नाहीत ना?, त्यांचीच चौकशी करा, आमदार देवयानी फरांदे यांची मागणी

अजितदादा यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर साडे नऊ महिने उलटूनही या प्रकरणात तपास झालेला नाही. या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल पुन्हा प्रेझेन्टेशन या प्रकरणातील संशयितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवत तर नाहीत असा सवाल केला आहे. त्यानंतर भाजपाचे नेते रोहित पवार यांच्यावर तुटून पडले आहेत. आता भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी अजितदादांच्या मृत्यू मागचे रोहित पवारच सूत्रधार नाही ना ? त्यामुळे त्यांची चौकशी करावी अशीही मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे.

भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार हेच तर अजित दादांच्या मृत्यू मागचे सूत्रधार नाही ना ? असा सवाल देवयानी फरांदे यांनी केले आहे. रोहित पवार ज्या पद्धतीने दादा गेल्यानंतर वागले आहेत त्यावरून त्यांचीच चौकशी करायला हवी अशी मागणी फरांदे यांनी केली आहे. आपण स्वत: रोहित पवार यांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असेही देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांना त्यांचे काका अजित दादांची जागा घेण्याची घाई झाली आहे. त्यासाठी ते सतत असे वागत आहेत. म्हणून त्यांचा असा आटापिटा सुरू आहे. मात्र राजकारणाता जनता जागा देत असते, कोणाला ती घेता येत नाही अशी टीका देवयानी फरांदे यांनी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी अजितदादांचा विमान अपघात झाला, त्या विमान कंपनीच्या मालकाची चौकशी केली जात नाहीए. व्हीएसआर विमान कंपनी आणि त्याचा मालक व्ही.के.सिंग यांना वाचवण्यामागे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादांच्या अपघाता मागे फडणवीस आहेत असे आपण म्हणत नाही. मात्र, विमान कंपनी मालकाविरोधात एफआयआर नोंद होत नाही. त्याला वाचवले जात आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस कंपनीच्या मालकाच्या मुलांच्या लग्नात उपस्थित होते. त्यांचे चांगले संबंध असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language