Hashtagintro

लग्नाच्या काही दिवस आधीच काळचा घाला! सिलिंडर स्फोटात बाप-लेकाचा अंत, चिमुकल्यासह कुटुंब आगीत होरपळले

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडातील दयानतपूर गावात सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेमुळे ग्रेटर नोएडा शहर हादरलं आहे. अत्यंत हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्नाच्या आनंदाचे क्षण अवघ्या काही वेळामध्ये भयान शांततेमध्ये बदलले आहे. घरातील गॅस सिलिंडरमधून अचानक वायू गळती झाल्यानंतर लागलेल्या आगीत आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. या भीषण दुर्घटनेत बाप- लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/23/will-west-bengal-now-become-paschim-banga-proposal-for-the-name-change-to-be-tabled-in-the-legislative-assembly/
मिळालेल्या माहितीनुसार, ही भयानक घटना सोमवारी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरातील जेवर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दयानतपूर गावात घडली. या कुटुंबातील मुलीचे लग्न येत्या 2 डिसेंबर रोजी ठरले होते. लग्नाच्या तयारीसाठी आणि खरेदीसाठी घरातील आई आणि मुलगी बाहेर गेल्या होत्या. नेमक्या याच वेळी घरामध्ये अत्यंत हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी घटना घडली. अचानक गॅस सिलिंडरमधून वायू गळती सुरू झाली आणि पाहता पाहता आगीचा भडका उडाला. त्यानंतर सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. यामध्ये कुटुंबातील काही सदस्यांचा अंत झाला आहे.
स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि घरात आक्रोश सुरू झाला. घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेले चौघेही आगीच्या कचाट्यात सापडले. या दुर्घटनेत 56 वर्षीय वीरपाल आणि त्यांचा 24 वर्षीय मुलगा अभिषेक यांचा जागीच मृत्यू झाला. तर अभिषेकची पत्नी काजल आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा आदित्य हे दोघे गंभीररीत्या भाजले आहेत. शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत आगीच्या कचाट्यात अडकलेल्या सर्वांना उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी वीरपाल आणि अभिषेक यांना मृत घोषित केले आणि अभिषेकच्या पत्नीवर आणि मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/23/ramayana-painting-to-gangajal-know-what-pm-modi-gifted-to-nepal-pm-balendra-shah/
घटनेची माहिती मिळताच जेवर पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आणि चिमुकल्या आदित्यचा चेहरा भाजला असून दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृतदेहांचे पंचनामे करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ग्रामस्थांमध्येही या दुर्घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रेटर नोएडाचे एडीसीपी संतोष कुमार यांनी या घटनेला दुजोरा देत माहिती दिली की, दयानतपूर गावातील एका घरात सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. तपासात वीरपाल यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेत वीरपाल आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांचा मृत्यू झाला असून काजल आणि दोन वर्षांचे चिमुकलं बाळ भाजल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/23/free-sanitary-napkins-for-girls-in-karnataka-schools-action-to-be-taken-for-non-compliance/
जेथे लग्नाची धामधूम, नातेवाईकांची वर्दळ आणि पाहुण्यांची लगबग असायला हवी होती, तिथे आता स्मशानशांतता आणि शोककळा पसरली आहे. लग्नाची खरेदी करून घरी परतणाऱ्या आई आणि बहिणीवर कोणता डोंगर कोसळणार आहे, याची कल्पनाही कुणाला नव्हती. गावातील प्रत्येक नागरिक या घटनेमुळे हळहळ व्यक्त करत असून कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत आहे. या अकल्पनीय घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबाची अवस्था पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी घडलेल्या या शोकांतिकेने सर्वांनाच सुन्न केले आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language