Hashtagintro

लतादीदीला छान अन् मलाच अशी गाणी का? आशा भोसले वैतागलेल्या; पुढे नको असलेल्या त्याच गाण्याने रचला इतिहास!

लतादीदीला छान अन् मलाच अशी गाणी का? आशा भोसले वैतागलेल्या; पुढे नको असलेल्या त्याच गाण्याने रचला इतिहास!

प्रत्येक गायकाला सर्व प्रकारची गाणी गाण्याची इच्छा असते. मात्र, सतत एकाच प्रकारची गाणी वाट्याला येत असतील तर कलाकाराला त्याचा कंटाळा येऊ शकतो. असाच काहीसा अनुभव ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आला होता. आपल्या वाट्याला वारंवार बोल्ड आणि कॅबरे गाणी येत असल्याने त्या चांगल्याच वैतागल्या होत्या. शांत आणि मधाळ गाणी लता मंगेशकर यांना मिळतात, तर आपल्यालाच अशी गाणी का दिली जातात? असा सवाल त्यांनी थेट संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याकडे उपस्थित केला होता.

‘पिया तू अब तो आजा’चा किस्सा

हा किस्सा आहे १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कारवाँ’ चित्रपटातील अजरामर ठरलेल्या ‘पिया तू अब तो आजा’ या गाण्याचा. आर. डी. बर्मन यांना आशाजींच्या आवाजातील वेगळेपणा आणि शैली या गाण्यासाठी योग्य वाटत होती. त्यामुळे त्यांनी आग्रह धरून हे गाणं आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतलं.

या गाण्याच्या लोकप्रियतेमागे एक रंजक किस्सा आहे. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी हे गाणं लिहिलं होतं. परंतु गाण्यातील काही शब्द आणि बोल्ड आशय पाहून ते स्वतःच अस्वस्थ झाले होते. रेकॉर्डिंग सुरू असताना ते स्टुडिओतून बाहेर पडले आणि जाताना आशा भोसले यांना म्हणाले, बेटी, मैंने गंदा गाना लिखा है, मेरी बेटियां बड़ी होकर ये गाना गाएंगी! म्हणजेच, आपण लिहिलेलं हे गाणं आपल्या मुली मोठ्या झाल्यावर गातील, याची त्यांना खंत वाटत होती.

 

 

‘मोनिका, ओ माय डार्लिंग’

त्या काळात आशा भोसले यांच्या काही बोल्ड गाण्यांवर टीकाही झाली होती आणि काही गाण्यांचं प्रसारण मुंबई आकाशवाणीवर बंदही करण्यात आलं होतं. मात्र, या टीकेचा गाण्याच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झाला नाही. आर. डी. बर्मन यांचे संगीत, आशा भोसले यांचा जादूई आवाज आणि पडद्यावर हेलन यांच्या नृत्याविष्काराने या गाण्याने लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठले. गाण्यातील ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ हा भाग विशेष गाजला. एकेकाळी ज्या गाण्यामुळे आशाताई नाराज झाल्या होत्या, त्याच गाण्याने पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आणि ते अजरामर ठरले.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language