
लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कुख्यात टोळीचा गँगस्टर हॅरी बॉक्सरला अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे. बिश्नोईच्या गँगमध्ये हॅरीचे तिसरं स्थान होतं. तो अमेरिकेत बसून भारतात गँग चालवत होता. याच हॅरी बॉक्सरने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. त्याने बॉलिवूडमधील अभिनेत्यांना धमक्या दिल्या होत्या. हॅरी बॉक्सरआधी गँगस्टर हिमांशू भाऊला देखील अमेरिकेच्या यंत्रणेने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईचा गँगचा गँगस्टर हॅरी बॉक्सरला कॅलिफोर्नियातून अटक केली. अमेरिकेची सुरक्षा यंत्रणाने हॅरीला विशेष खबर मिळाल्यानंतर अटक केली. भारतीय वेळेनुसार, हॅरीला शुक्रवारी रात्री अटक केली. हॅरी बॉक्सर हा गेल्या अनेक वर्षांपासून बिश्नोईच्या गँगमध्ये सक्रिय होता. त्यांच्याविरोधात हत्या, धमकावणे, खंडणी वसुलीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आताच कुख्यात गँगस्टरच्या मुसक्या आवळण्यास अमेरिकेच्या एजन्सीने सुरुवात केली आहे. रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी त्याने घेतली होती. या टोळीने बॉलिवडूच्या कलाकारांची झोप उडवली होती. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील मेम्बरने टायगर श्रॉफच्या कारवरही गोळीबार केला होता. या घटनेने सिनेकलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
गँगस्टर हॅरी बॉक्सरच्या अटकेने भारतीय सुरक्षा एजन्सीला मोठं यश मिळालं आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य हॅरीविषयीची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्याला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आली. आता त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसहित मुंबई आणि हरियाणा पोलीस देखील त्याच्या शोधात होती. अनेक वर्षांनंतर हॅरीच्या मुसक्या आवळ्यात यश आलं आहे. आता त्याच्या चौकशीत लॉरेन्स बिश्नोईचं कामकाज कसं चालतं, याची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्यतिरिक्त गँगच्या टार्गेटवर आणखी कोण कोण आहे, याची देखील माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्याने अनेक बॉलिवूड कलाकार, सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्याकडून खंडणी मागितली होती.
Source: TV9 Marathi International
